Gangster Nilesh Ghaywal, Pune : पुण्यातून पळ काढून परदेशात गेलेल्या निलेश घायवळ या गुंडाचे कारनामे अजूनही सुरुच आहेत. "माझा बाप सावकार होता, पुण्यातील दुकानं बंद पाडेल", असं म्हणत त्याने धाराशिवच्या एका व्यापाऱ्याने धमकी दिल्याची जुनी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यावेळी निलेश घायवळने शिवीगाळ केली असून तू सावंत साहेबांना मध्ये कशाला घेतो? असा प्रश्न करत बंगल्यावर येण्याची धमकी दिली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळने काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पळ काढला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील फरार झाले होते. मात्र, परदेशात पळ काढणाऱ्या घायवळच्या या ऑडिओ क्लिपवरून दहशतीचं वातावरण निर्माण होतंय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हणाला निलेश घायवळ?
निलेश घायवळ या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाला, किती वेळात येतो? तू ये मी तुला काहीही करत नाही. तुला चार शब्द बोलायचे आहेत. तू आला नाहीस आणि कोणाला इकडं तिकडं सांगितलं तर पुण्यातील दुकानं बंद करुन टाकेन. शहाना असशील तर बंगल्यावर ये. मी गरीबीतून आलो नाही. माझा बाप पहिल्यापासून सावकार होता. तुला मस्ती कशामुळे आहे. तुझ्यामुळे सावंत साहेब मोठा झाला काय? साहेबांचा आणि माझा काहीही संबंध नाही. तू बंगल्यावर ये. घाबरायचं असेल मोठ्या माणसाच्या कशाला नादी लागायचं. सावंत साहेबांचा विषय तू काढला.
तू सावंत साहेबांना मध्ये कशामुळे घेतलं? मी त्यांना आमदार केला का?
तू सावंत साहेबांना मध्ये कशामुळे घेतलं? दिनेश बंगल्यावर ये माझं काम आहे, मी एवढंच बोललो होतो. माझ्या जीवावर आमदार झाला का तो? मी त्यांना आमदार केला का? तुझं पुण्यातील सगळं बंद पाडेन. थांब मी घरी येतो, असं म्हणत निलेश घायवळने धाराशिवच्या व्यापाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सातारा : काकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, गरोदर असल्याचं समजताच कोयना धरणाच्या किनारी...
ADVERTISEMENT











