Ganpat Gaikwad : गोळीबार प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, ‘कायदा सगळ्यांना…’

प्रशांत गोमाणे

• 10:37 AM • 03 Feb 2024

कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. .यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. तसेच अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असे यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.

ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad devendra fadnavis reaction ulhasnagar firing incident jupitar hospital

ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad devendra fadnavis reaction ulhasnagar firing incident jupitar hospital

follow google news

Ulhasnagar firing incident, Devendra Fadnavis Reaction : उल्हासनगर हिलनगर पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर बेछुट गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती.या गोळीबाराचे आता सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या गोळीबार प्रकरणात आता गणपत गायकवाडांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचार सूरू आहे. महेश गायकवाड तर मृत्यूशी झूंज देत आहेत. या गोळीबार प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.  (ganpat gaikwad open fire on mahesh gaikwad devendra fadnavis reaction ulhasnagar firing incident jupitar hospital)

हे वाचलं का?

बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यानिमित्त माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणात उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजींना तसे आदेश देण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : ‘हा निव्वळ मूर्खपणा…’ Poonam Pandey निधनाची Instagram पोस्ट म्हणजे फक्त…

कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. तसेच गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली? गोळीबाराच सत्य आपल्याला बाहेर काढाव लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. तसेच अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल, असे यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

प्राथमिक माहितीनुसार, महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीवरून काही वाद सुरू होता. याच वादातून २ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा दोन्ही नेते हे आपल्या समर्थकांसह उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाणे येथे पोहचले होते. याचवेळी आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अचानक गणपत गायकवाड यांनी आपल्या जवळच्या बंदुकीतून थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. महेशच्या पोटात आणि इतर अवयवांना चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजते आहे.

    follow whatsapp