Crime News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. संबंधित 40 वर्षीय सुजीत मिश्रा नावाच्या तरुणाचं एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सुजीतच्या प्रेयसीचे आणखी 2 तरुणांसोबत संबंध असल्याचं समोर आलं. त्या दोघांनी मिळून सुजीतला खूप त्रास दिल्याचा आरोप आहे. याच त्रासाला कंटाळून अखेर सुजीतने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा निर्णय
खरं तर, पीडित सुजीतचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या रूबी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रूबीचे आधीच आणखी दोन प्रियकर असल्याची सुजीतला अजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर, रूबी आणि तिच्या दोन्ही प्रियकरांनी मिळून सूजीतवर दबाव आणण्यास सुरू केली. आता, पीडित तरुणाला सतत मानसिक छळ, धमक्या आणि अपमान सहन करावा लागत होता. ही बाब तो त्याच्या कुटुंबियांना सांगू शकला नाही. सततच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर त्याने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, सुजीतने आधी 112 नंबरवर फोन केला आणि तो विष प्राशन करणार असल्याचं त्याने सांगितलं. सोशल मीडियावर सुद्धा याचा ऑडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
हे ही वाचा: Govt Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये फ्रेशर्स उमेदवारांसाठी तब्बल 600 पदांसाठी भरती! कधीपासून कराल अर्ज?
पोलिसांचा तपास
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सुजीतशी संपर्क केला आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलवलं. मात्र, सुजीतने पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला आणि सतत विष प्राशन करणार असल्याचं बोलू लागला. पोलिसांनी तातडीने त्याचा तपास सुरू केला. काही वेळानंतर, घरापासून काही अंतरावर सुजीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला लखनऊ येथे रेफर केलं. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच सुजीतचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: पुणे : अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कंपनीवर छापा; नेमकं काय सापडलं?
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लखीपूरच्या भीरा पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय सुजीत मिश्राने त्यांना फोन करून माहिती दिली की "एक महिला आणि तिचे दोन प्रियकर माझा मानसिक छळ करत आहेत. त्यामुळेच, मी विष प्राशन करत आहे." याच माहितीच्या आधारे, पोलिसांनी त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं आणि त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्याला लखनऊ येथे रेफर करण्यात आलं मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. आता, सुजीतच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, या प्रकरणात पुढील कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT











