सासूचा फक्त 'तो' निर्णय आवडला नाही म्हणून दिली सुपारी... पण, अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना

एका सुनेने सासूच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिलेने तिच्या सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना

अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना

मुंबई तक

• 12:28 PM • 17 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासूचा 'तो' निर्णय आवडला नाही म्हणून दिली सुपारी

point

अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना

Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका सुनेने सासूच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिलेने तिच्या सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली होती, पण सुदैवाने या सगळ्यातून पीडिता वाचली. आता या प्रकरणासंबंधी पोलिसांनी तीन तरुणांनी अटक केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

संपत्तीच्या कारणावरून रचला भयानक कट 

खरंतर, प्रकरणातील पीडिता ही आरोपी महिलेची सावत्र सासू असल्यामुळे सुनेला भीती अशी होती की सासूची संपत्ती तिच्या सख्ख्या मुलांमध्ये वाटली जाईल. म्हणून, आरोपी सुनेने तिच्या सासूला संपवण्याचा एक भयानक कट रचला. पण, या सगळ्यात तिचा हत्येचा कट उघडकीस आला आणि ती पकडली गेली.

सासूची हत्या करण्यासाठी सुपारी दिली अन्...

रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिलेचं नाव कोमल असून ती तिला तिची सावत्र सासू सीमा देवी हिच्यावर प्रचंड राग होता. कारण, सीमाने एक मूल दत्तक घेण्याची इच्छ व्यक्त केली होती. त्यानंतर, मुलाच्या येण्याने मालमत्तेतील तिचा वाटा कमी होईल अशी कोमलला भीती होती. त्यामुळेच, आरोपी महिलेने तिच्या सावत्र सासूची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. 

आपल्या भावासोबत मिळून कोमलने तिच्या सासूच्या हत्येचा कट रचला. तिने त्याच्या भावाला सासूची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. 12 ऑक्टोबर रोजी, आरोपी महिलेचा भाऊ भव्य मास्क घालून सरधना येथील बहिणीच्या घरात घुसला आणि त्याने सीमा देवीवर गोळी झाडली. त्यावेळी, ती गोळी पीडितेच्या पायाला लागली आणि ती गंभीररित्या जखमी झाली. मात्र, या सगळ्यात सासूचा जीव वाचला.

हे ही वाचा: अमेरिकेत शिकणारा तरुण वांद्र्याच्या हॉटेलमध्ये गेला अन् अभ्यास करण्याच्या बहाण्याने पीडितेसोबत नको ते... नेमकं काय घडलं?

पोलिसांचा तपास 

घटनेनंतर, पीडितेचे पती मुकेश चंद यांनी सरधना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. याबाबत, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पथके तयार केली आणि आरोपी भव्यला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, घटनेत वापरली गेलेली पिस्तूल त्याने हर्षितला दिल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं. 

हे ही वाचा: नागपूर : क्रिकेट खेळताना अवघड जागेला बॅट लागली, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, महिनाभरापूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

भव्यच्या सांगण्यावरून, पोलिसांनी हर्षितचा शोध घेतला आणि त्याला अटक करून त्याच्याकडे असलेलं हत्याक ताब्यात घेतलं. या प्रकरणातील कोमल, भव्य आणि हर्षित या तिन्ही आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. मेरठ ग्रामीण क्षेत्राच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीदरम्यान बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत. 

    follow whatsapp