Crime News : एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील दोन वर्गमित्र आणि एका दहावीतील विद्यार्थ्याकडून या 12 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केले जात होते. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. हरियाणातील फरिदाबादमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
स्वच्छतागृहात नेऊन लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा एके दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच वेळी त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थी आणि दहावीत शिकणारा एक 16 वर्षीय विद्यार्थी त्याला बहाण्याने शाळेच्या स्वच्छतागृहात घेऊन गेले. तिथे या तिघांनी मिळून त्या मुलाचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर आरोपी मुलांनी सलग काही दिवस पीडित मुलाला अशाच प्रकारे त्रास दिला आणि त्याचे शोषण करणे सुरूच ठेवले.
हे ही वाचा : रुममध्ये पार्टी, दारु अन् शरीरसंबंध; नंतर प्रेमीयुगुलाचा थेट मृत्यू, नेमकं काय घडलं?
वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला तो वडिलांच्या सतर्कतेमुळे. आपला मुलगा गेल्या काही दिवसांपासून खूपच शांत आणि उदास असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी प्रेमाने विचारपूस केली असता मुलाने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची रीतसर तक्रार दाखल केली. पीडित मुलगा आणि आरोपी विद्यार्थी हे एकाच गावातील रहिवासी असल्याचे समजते.
हे ही वाचा : भावासाठी जेवण बनवलं, अन् नंतर आली मृत्यूची बातमी..., दिव्यांकासोबत काय घडलं?
पीडित मुलाचे समुपदेशन
पोलीस ठाण्याचे प्रभारी ब्रह्म प्रकाश यांनी सांगितले की, 'तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. पीडित मुलाचे समुपदेशन करण्यात येत असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.' या घटनेमुळे परिसरात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पोलीस तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











