रुममध्ये पार्टी, दारु अन् शरीरसंबंध; नंतर प्रेमीयुगुलाचा थेट मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले असता, त्यांना तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रुममध्ये पार्टी, दारु अन् शरीरसंबंध
नंतर प्रेमीयुगुलाचा थेट मृत्यू
नेमकं काय घडलं?
Crime News : छत्तीसगडमधील बिलासपूर येथील अभिलाषा परिसरातील ईडब्ल्यूएस कॉलनीमध्ये मध्यरात्री एक थरारक घटना घडली. एका प्रेमी युगुलाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक घराबाहेर आले असता, त्यांना तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मद्यप्राशन आणि वादाची शक्यता
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि जखमी तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. घटनेच्या रात्री दोघेही इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पार्टी करण्यासाठी गेले होते. पोलिसांना छतावर दारूच्या बाटल्या, काही कपडे आणि अन्य संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, तरुण खाली पडला तेव्हा तो अंतर्वस्त्रात होता, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. छतावर मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले आणि नंतर काही कारणावरून वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हे ही वाचा : 'माझ्या मृतदेहाला वडिलांनी स्पर्श सुद्धा करु नये', वकिलाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय?
पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास
ही घटना आत्महत्या आहे, अपघात आहे की यामागे घातपाताचा काही प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमने महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील कसून तपासणी केली जात आहे. तरुणाचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून, त्यांच्या मित्रपरिवाराची आणि नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे ही वाचा : भावासाठी जेवण बनवलं, अन् नंतर आली मृत्यूची बातमी..., दिव्यांकासोबत काय घडलं?
तरुणीच्या जबाबाकडे लक्ष
या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी आता पोलिसांना जखमी तरुणी शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्या रात्री छतावर नक्की काय घडले होते आणि त्यांनी खाली उडी का घेतली, याचे सत्य केवळ तिच्या जबाबातूनच समोर येऊ शकेल. सध्या पोलीस तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे या प्रकरणाच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.









