गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य! आधी बेदम मारहाण अन् नंतर गळा चिरून... अखेर छतावरून मारली उडी

पतीने आपल्या गरोदर पत्नीला बेदम मारहाण केली आणि अखेर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. हत्येनंतर आरोपी पती घराच्या छातावरून उडी मारून फरार झाल्याची माहिती आहे.

गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य!

गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य!

मुंबई तक

• 10:36 AM • 25 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य

point

आधी बेदम मारहाण अन् नंतर गळा चिरून...

point

नेमकं कारण काय?

Crime News: एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडल्याची माहिती आहे. गिद्धौर पोलीस स्टेशन परिसरातील गंगरा पंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधी आश्रममध्ये पतीने आपल्या गरोदर पत्नीला बेदम मारहाण केली आणि अखेर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वाद हेच हत्येमागचं कारण असल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर आरोपी पती घराच्या छातावरून उडी मारून फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी...

प्रकरणातील मृत महिलेचं नाव सरिता देवी असल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच गिद्धौर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला. 

पीडितेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही माहिन्यांपासून सरिता देवी आणि तिचा पती शुभम कुमार यांच्यात सातत्याने वाद होत होते. नेहमीप्रमाणे, बुधवारी (24 सप्टेंबर) पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाल्याचं आरोपीचे वडील मानो रावत आणि त्याच्या आईने सांगितलं. त्या दिवशी, जवळपास 4 वाजताच्या सुमारास शुभमने आपल्या पत्नीला खोलीत बंद केलं.

हे ही वाचा: भावाने बहिणीचीच केली निर्घृण हत्या! नंतर, मृतदेह पोत्यात भरला अन् चहाच्या मळ्यात... 'असा' झाला घटनेचा खुलासा

धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या 

त्यानंतर, आरोपी पतीने आपल्या पत्नीला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर, बचावासाठी आरोपीने घराच्या छतावरून उडी मारली आणि तिथून तो फरार झाल्याचं सांगितलं जात आहे. 

महिलेच्या भावाने केली तक्रार दाखल 

मृत महिलेच्या भावाने यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी तक्रार करताना त्याने सांगितलं की 2022 मध्ये आपल्या बहिणीचं लग्न गांधी आश्रम येथील रहिवासी शुभम कुमार नावाच्या तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर, दोघांना एक मुलगा सुद्धा झाला. मात्र, मागील काही महिन्यांपासून दोघे पती आणि पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वाद व्हायचे आणि यात शुभम नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. 

हे ही वाचा: बायको गेली पळून, नंतर मेहुणीसोबत केलं 'ते' कृत्य! भाचीने पाहिलं म्हणून थेट बोटंच छाटली... नेमकं काय घडलं?

या प्रकरणासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान, पतीने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचं समोर आलं आहे. आता महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन संबंधित घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp