बायको गेली पळून, नंतर मेहुणीसोबत केलं 'ते' कृत्य! भाचीने पाहिलं म्हणून थेट बोटंच छाटली... नेमकं काय घडलं?
एका 49 वर्षीय व्यक्तीने आपल्या मेहुणीची धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने मृताच्या मुलीची म्हणजेच आपल्या भाचीची बोटंच कापून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तरुणाने मेहुणीसोबत केलं निर्घृण कृत्य...

भाचीने पाहिलं म्हणून थेट बोटंच छाटली...
Murder Case: दिल्लीच्या ख्याला परिसरातून एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. एका 49 वर्षीय व्यक्तीने आपल्या मेहुणीची धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने मृताच्या मुलीची म्हणजेच आपल्या भाचीची बोटंच कापून टाकल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्याने एका नातेवाईक महिलेवर देखील हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव इस्तेखार अहमद उर्फ बब्बू असून त्याच्या मेहुणीचं नाव नुसरत असल्याचं सांगितलं जात आहे. नुसरत आणि तिच्या इतर नातेवाईकांनी आपल्या पत्नीला दुसऱ्याच पुरुषासोबत पळून जाण्यासाठी मदत केल्याचा बब्बूला संशय होता.
पोलिसांना मिळाली माहिती
संबंधित घटना पश्चिम दिल्लीच्या ख्याली परिसरातील जेजे कॉलनीमध्ये घडल्याची माहिती आहे. पोलिसांना सकाळी, जवळपास 8:05 वाजताच्या सुमारास, एक PCR कॉल मिळाला. पोलिसांना प्रकरणाची माहिती देणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की गाजियाबाद येथील लोनीमध्ये राहणारा बब्बू हा एक सिक्योरिटी गार्ड असून त्याने घरात घुसून घरातील महिलांवर हल्ला केला.
छातीवर आणि मानेवर केले वार...
बब्बू सकाळी 7 वाजताच्या सुमारास नुसरतच्या घरी पोहोचला. तो आपल्यासोबत एका टिफिन बॉक्समध्ये धारदार शस्त्र लपवून घेऊन आला होता. नुसरतने आरोपीला चहासाठी विचारलं असता त्याने अचानक तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. नुसरतच्या छाती आणि मानेवर त्याने बरेच वार केले. याच कारणामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. पीडितेची मुलगी सानियाने आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने मुलीवर देखील हल्ला केला आणि तिची बोटं छाटली. त्यानंतर, अकबरी नावाच्या घरातील दुसऱ्या महिलेवर सुद्धा बब्बूने हल्ला केला.