Today Shocking Viral News : मुजफ्फरनगरच्या एका धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने 30 वर्षीय कपडा व्यापाऱ्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने त्याच्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची 2020 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याने या हत्येबाबत खोटा दावा केला होता की, त्याच्या पत्नीची हत्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झाली.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2020 मध्ये घडली होती. त्यावेळी कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहा:कार माजवला होता. त्याच दरम्यान, आरोपी ए.एस मोहम्मदने त्याची 25 वर्षीय पत्नी तबस्सुमची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या कुटुंबियांना खोटी माहिती दिली. आरोपीने सांगितलं की, कोरोनामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे तबस्सुमला पोस्टमॉर्टमशिवाय दफन करण्यात आलं.
तबस्सुमचे मामा मुर्तजा अहमदला तिच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी म्हटलं की, जेव्हा तो त्याच्या भाचीच्या सासरी शिकारपूर गावात गेला होता. तेव्हा भाचीचा मृत्यू झाल्याचं कळलं. तिच्या शरीरावर जखम झाली होती. पण सासरच्या लोकांनी सांगितलं की, तिचा मृत्यू कोरानामुळे झाला, त्यामुळे घाईघाईत तिला दफन केलं गेलं. तीन दिवसानंतर मुर्तजा अहमद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, तबस्सुमची हत्या हुंड्याच्या छळामुळे करण्यात आली होती.
हे ही वाचा >> Maratha Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा GR काढला, पण त्याचा खरा अर्थ काय?
लग्न आणि हुंड्याची मागणी
तक्रारीत म्हटलंय की, तबस्सुमचं लग्न मोहम्मदसोबत जवळपास 5 वर्षांपूर्वी झालं होतं. लग्नाच्या वेळी हुंडाही देण्यात आला होता. पण तरीही तिचा पती आणि कुटुंबातील लोक अतिरिक्त 2 लाख रुपयांची मागणी करत होते. यामुळे तबस्सुमचा छळ केला जायचा.
पोस्टमार्टम आणि गुन्हा दाखल
तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कबरीतून मृतदेह काढला. त्यानंतर उघडकीस आलं की, तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला होता. त्यानंतर पोलिसांनी पती ए.एस मोहम्मद, त्याची आई शमीम (55) वर्ष, भाऊ मोहम्मद इंसाफ (28 वर्ष) आणि काकी शबरिन (50) वर्ष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >> "उडी मार..." पतीने केलं प्रवृत्त अन् पत्नीने घराच्या छतावरून मारली उडी! जखमी झाल्यावर सुद्धा...
न्यायालयाचा निर्णय
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निशांत सिंगला यांनी मंगळवारी याप्रकरणाची सुनावणी केली आणि आरोपी ए.एस मोहम्मदला दोषी ठरवलं. न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली आणि 56000 रुपयांचा दंड ठोठावला.
ADVERTISEMENT
