Husband Killed Wife Crime News : जमशेदपूरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा कापून तिची हत्या केली. आता या प्रकरणाचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, गुरप्रीत सिंह उर्फ सागरला संशय होता की, त्याच्या पत्नीचं अफेअर होतं.
ADVERTISEMENT
यामुळे त्यांच्यात अनेकदा वादविवाद होत होते. पती शक्तीवर्धक गोळ्या खाऊन पत्नीसोबत शरीरिक संबंध करण्याचा प्रयत्न करायचा. पण पत्नी त्याला नकार द्यायची. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. उशिरा रात्रीपर्यंत भांडण सुरु होतं. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात सागरने त्याच्या पत्नीचा चाकूने गळा कापून हत्या केली. मनीषा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पती सागरला अटक केलीय.
हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी होणार... 'ही' खास ट्रेन लवकरच धावणार
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आणि..
याबाबत सविस्तर वृत्त असं की, हत्येनंतर सागर फरार झाला. त्याने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या चाकूला डोबो पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेकून दिलं आणि तो तिथेच लपला होता. त्यानंतर पोलिसांनी याचठिकाणी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो पत्नीवर संशय घ्यायचा. त्यामुळे तो मानसिक तणावात जगत होता. एसएसपी पीयूष पांडे यांनी म्हटलं की, याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. महिलेची हत्या कोणत्या कोणत्या कारणांमुळे झाली, याचा तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> पैसै कमावून पती घरी आला..पत्नीला प्रियकरासोबत शारीरिक संबंध करताना पकडलं! पतीने कुऱ्हाड उचलली अन्..
गोलमुरीच्या नामदा वस्तीत शनिवारी पती सागरने पत्नी मनिषाचा गळा कापून खून केला. हत्येच्या घटनेनंतर जवळपास आठ तासांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांना हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू डोबो पुलाच्या खाली सापडला. जेव्हा मनीष दोन लहान मुलांसोबत झोपेत होती, तेव्हा आरोपी पतीने तिची हत्या केली.
ADVERTISEMENT
