Crime News: लखनऊच्या मांडिया भागातील एका तरुणीने एका खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर ब्लॅकमेलिंग, लैंगिक शोषण आणि गर्भपाताचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेचं म्हणणं आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले, नंतर तिला नशेचे पदार्थ देऊन तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर तरुणाने पीडितेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. जेव्हा महिला गर्भवती राहिली होती, तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यास जबरदस्ती केली. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, आरोपीचे आधीच लग्न झाले होते. तो त्याच्या डॉक्टरांसह पीडितेला धमकी देत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां## की...?', पीएसआयकडून तरुणींवर गंभीर आरोप, पुण्यात नेमकं काय घडलं?
पीडितेचा आरोप
पीडितेचा आरोप आहे की, शिवानंद सिंग नावाचा आरोपी हा प्रयागराज येथील रहिवासी आहे. तो कल्याणपूर येथील एका रुग्णालयात कार्यरत आहे. तो त्याच्या आजारीअसलेल्या आजोबांची काळजी घेण्याचं खोटं कारण सांगत तरुणीला जवळ करू लागला आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर 18 एप्रिल 2024 शिवानंदने मुलीला त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले आणि तिला नशेचे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
दरम्यान, त्याने मुलीचा व्हिडिओही बनवला आणि तिला अनेकदा धमकावू लागला. काही काळनंतर. मुलगी गर्भवती राहिली असता, आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, जेव्हा तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा तिला कळले की, आरोपी लॅब टेक्निशियनशी लग्न झाले आहे.
लग्नाचे सत्य बाहेर आल अन्..
लग्नाचे सत्य समोर आल्यानंतर, शिवानंदने आपल्या होणाऱ्या पत्नीच्या साथीनं आणि डॉक्टरांच्या मदतीने पीडितेला धमकावल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. तर डॉक्टरांनी तिला शांत राहण्यास सांगितलं, कोणालाही काहीही न सांगण्याचा दबाव आणला. तिघांवरही माडियांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड
संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी घडलेल्या एकूण घटनेचा पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुराव्याच्या आधारे केली जाईल आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कायदेशीर पावले उचलावीत, असेही सांगितले.
ADVERTISEMENT
