Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथील जानीपुर पोलीस स्टेशन परिसरात हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एम्सच्या सुरक्षारक्षकाच्या दोन मुलांना दिवसाढवळ्या जाळून मारण्यात आले. या संतापजनक घटनेमागे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून लवकरच खरं कारण समोर येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
आईच्या प्रियकराने केली मुलांची हत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, शोभा देवी नावाची माहिती एम्स गार्ड म्हणून कार्यरत असून तिचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. मात्र, काही कारणास्तव शोभा देवी आणि तिच्या प्रियकरामध्ये अंतर निर्माण झाले. याच कारणामुळे महिलेच्या प्रियकराने तिच्या दोन मुलांची हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रकरणातील आरोपींनी शोभा देवीची 14 वर्षांची मुलगी अंजली कुमारी हिच्या तोंडात कापड कोंबले आणि तिचा मुलगा अंशच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या शरीरावर रॉकेल ओतलं आणि त्या दोघांना निदर्यीपणे जाळून हत्या केली.
हे ही वाचा: विवाहित पुरुषाचे लिव्ह इन पार्टनरसोबत संबंध, पण पत्नी आजारी अन् पार्टनरला खटकली 'ती' गोष्ट मग थेट...
दोन्ही मुलांना जाळून...
दोन्ही मुलांना जाळून त्यांचा मृत्यू होईपर्यंत आरोपी घरातच असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी आरोपी अंजलीला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंशने पाहिलं. जर अंश जिवंत राहिला तर तो पोलिसांना सर्व काही सांगून टाकेल अशी आरोपींना भिती होती, म्हणून सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी अंशचीही निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
पोलिसांचा तपास
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर चार आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस लवकरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हत्येपूर्वी आरोपींनी अंजलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी व्हेजाइनल स्वॅब आणि जळालेले साहित्य एफएसएलमध्ये पाठवले असून अंजलीचे कपडेही एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
हे ही वाचा: "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड
जानीपुरच्या नागवा गावात भाऊ बहिणीच्या हत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी पोस्टमॉर्टम केल्यानंतर दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
ADVERTISEMENT
