Suicide case : ऑनलाईन गेमचा नाद खरं तर खूप वाईट आहे. या ऑनलाईन गेममुळे देशातील तरुण भिकेला लागला आहे. तर काहींना आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे. ऑनलाईन गेमने एका 12 वर्षाच्या मुलाचा जीव गमावला आहे. ही घटना 31 जुलै रोजी घडली असून या घटनेमागचं महत्त्वाचं कारण आता समोर आलं आहे. ऑनलाईन गेम खेळताना मुलाने आईच्या मोबाईलमधील 3 हजार रुपये खर्च केलं. यातूनच मुलाने ही आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "शिवछत्रपतींच्या रायगडमध्ये डान्सबार?' राज ठाकरेंचा प्रश्न आणि मनसैनिक पनवेलच्या रस्त्यावर, 'नाईट रायडर्स' डान्स बारची तोडफोड
बराच वेळ दरवाजा बंद
संबंधित प्रकरणाची माहिती आईला कळताच तिने आपल्या मुलाला फटकारण्याऐवजी प्रेमाने त्याना समजावून सांगितलं. या गोष्टीचा मुलावर इतका खोल परिणाण झाला की तो शांतपणे त्याच्या खोलीत केला आणि तो बराच वेळ बाहेर आलाच नाही. आपला मुलगा बाहेर का येत नाही, तसेच बराच वेळ दरवाजा बंद असल्याचा पाहून कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणीही दरवाजा उघडत नव्हते, यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली होती.
मुलाने उचललं टोकाचं पाऊल
त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता, कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेचा मुलाच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला. त्यानंतर पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं. आपला मुलगा असं काही करेल, याची जाणीव आपल्या आईला नव्हती. परिस्थिती पाहता मुलाला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.
हे ही वाचा : शिक्षिकेला मुख्यध्यापकाने कारमध्ये बसवलं अन् नेलं अज्ञात स्थळी, लग्नानंतर पतीला अन् दिराला 'तसले' फोटो पाठवले
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस अधिकारी राजेश जैन यांनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं सांगितलं. ऑनलाईन गेम आणि पैशांच्या व्यवहारातूनच मुलाने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती उघडकीस आली.
ADVERTISEMENT
