वासनांध प्रिन्सिपलने शिक्षिकेच्या दिराला आणि पतीला पाठवले तिचे न्यूड फोटो, कारण...
Crime News : मुख्यध्यापकाने शिक्षिकेला एका अज्ञात स्थळी नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर त्याने पीडितेचे अश्लील फोटो तिच्या पतीला आणि दिराला पाठवले.

बातम्या हायलाइट

मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचं लैंगिक शोषण

कारमध्ये बसवलं अन् निर्जनस्थळी नेलं

पती आणि दिराला पाठवले 'तसले' फोटो
Crime News : मध्य प्रदेश राज्यातील सताना पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका महिला शिक्षिकेचं लैंगिक शोषण केलं. पीडित शिक्षिकेच्या विवाहानंतर फोटोशॉपच्या आधारे तिचे व्हिडिओ एडिट केले. संबंधित प्रकरणात पोलीस अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी आरोपी मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही आरोपी प्राध्यापक धीर सिंग (वय 40) यांच्या शाळेत 2023 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्यानंतर 18 जानेवारी 2024 रोजी पीडितेनं रुग्णालयात जाण्यासाठी सुट्टीची मागणी केली. मुख्याध्यापक धीर सिंगने पीडितेला सुट्टी दिली, त्यानंतर त्याने पीडितेला आपल्या कारमध्ये बसवले.
पीडितेला कारमध्ये बसवलं अन् अज्ञातस्थळी...
पीडित शिक्षिका कारमध्ये बसल्यानंतर आरोपी तिला एका अज्ञात स्थळी घेऊन गेला. तेव्हा पीडित शिक्षिकेनं अनेकदा विरोध करण्याचा प्रयत्नही केला असता, त्याने वेगाने कार चालवण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने पीडित शिक्षिकेसोबत हैवानी कृत्य केलं. महिलेसोबत जबरदस्ती संबंध बनवले आणि तिचा व्हिडिओही बनवला. आरोपीने मुख्याध्यापकाने संबंधित घडलेल्या प्रकरणाबाबत काही सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.
हे प्रकरण कोतवाली शहर पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर टीआई रविंद्र द्विवेदीनं सांगितलं की, आरोपी धीर सिंग यांनी पीडेतेचे काही आक्षेपार्ह फोटोशूट केलं होतं. त्यानंतर, फोटोशॉपचा वापर करत तिचे न्यूड फोटो बनवले आणि पीडितेला अनेकदा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिला समाजाच्या भीतीने गप्प राहिली आणि नंतर तिने लग्न केले. परंतु, आरोपीचे घाणेरडे कृत्य थांबले नाही. त्याने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो तिच्या पती आणि भावाच्या मोबाईलवर पाठवले. या घटनेमुळे पीडिता पूर्णपणे मानसिकरित्या खचली. तिने तिच्या पतीला एकूण झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले.
हे ही वाचा : 'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा...' राज ठाकरेंची 'ही' बोचरी टीका, CM फडणवीसांना डिवचलं!
पतीने पत्नीला धीर दिला असता, पत्नीनं पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंद केली. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाई करत आरोपी धीर सिंहला बेड्या ठोकल्या. शनिवारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.