महिलेचा जडला रिक्षावाल्यावर जीव, बाईने अनैतिक संबंधासाठी केला कहरच

extra marrital affair : महिलेनं पतीला संपवण्यासाठी आपल्याच नातेवाईकाला पन्नास हजारांची सुपारी दिली आहे. याच प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

extra marrital affairs (Grok)

extra marrital affairs

मुंबई तक

04 Aug 2025 (अपडेटेड: 04 Aug 2025, 09:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला बॉयफ्रेंडसह केली अटक

point

विवाहबाह्य संबंधातून पतीला संपवण्याची दिली सुपारी

extra marrital affair : दिल्लीत एका महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडसह पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. महिलेनं तिच्याच मेहण्याला हाताशी धरून तरुणाची हत्या केली आणि नंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात महिलेनं आपल्याच मेहुण्याला मारहाण करण्यासाठी सुपारी म्हणून 50 हजार रुपयांची ऑफर दिली. हे प्रकरण दिल्लीतील अलीपूर येथील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...

सोनिया ही 15 वर्षांची असताना प्रीतमच्या प्रेमात पार वेडीपीसी झाली होती. नंतर दोघांनीही कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन विवाह केला. या लग्नापासून त्यांना तीन अपत्य आहेत. लग्नानंतर सोनिया ही एका ऑटो ड्रायव्हरच्या प्रेमात पडली होती. लग्नाच्या अवघ्या 17 वर्षानंतर सोनियाला आणखी कोणीतरी आवडू लागलं होतं. सोनियाचा प्रियकर रोहित (वय 28) हा गुन्हेगार होता. तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्यानंतर त्याचे सोनियासोबत प्रेमसंबंध सुरु झाले होते. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते. यामुळे दोघांनीही प्रीतमला संपवण्याचा कट रचला.

50 हजार रुपये घेत प्रीतमची हत्या

पोलिसांनी सांगितलं की, दरम्यान, विजय हा सोनियाचा मेहुणा असून त्याने 50 हजार रुपये घेत प्रीतमची हत्या केली. या झालेल्या हत्येनंतर प्रीतमच्या मृतदेहाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सोनियाला पाठवला आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर सोनियाने तिच्या पतीची ऑटो रिक्षा विकली आणि उर्वरित रक्कम त्याला दिली.

त्यानंतर 20 जुलै रोजी सोनियाने अलीपूर पोलीस ठाण्यात प्रीतम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत म्हटलं की, तिचा पती बाहेर गेला होता आणि त्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. सुरूवातीला पोलिसांनी या घटनेत पती फरार असल्याची शक्यता वर्तवली. पोलिसांना तपासादरम्यान, प्रीतमच्या संबंधित एक मोबाईल फोन सापडला. या नंबरवरून पोलिसांचे पथक हे रोहितकडे चौकशीसाठी गेले होते. पोलिसांनी सांगितलं की, सुरूवातीला चौकशी केली असता, रोहितने दिशाभूल केली. तथापि, नंतर त्याने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.

हे ही वाचा : धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

त्यानंतर सोनियाने पुराने नष्ट करण्यासाठी प्रीतमचा मोबाईल फेकून दिला. महागडा फोन असल्याचे पाहून तिने केवळ सिमकार्डच फेकून दिले आणि फोन आपल्याकडेच ठेवला. काही दिवसानंतर तिने तिचे सिमकार्ड ठेवले आणि फोन चालू केला. रोहितच्या या एका चुकीमुळे या हत्येचं गुढ उकललं गेलं.

    follow whatsapp