पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...

मुंबई तक

Crime News : शिल्पा नावाच्या तरुणीने एका वर्षापूर्वी तिच्या पतीची हत्या केली होती. तिने तिच्या पतीचा मृतदेह हा एका गावातील नाल्यात फेकून दिला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने बॉयफ्रेंडसाठी पतीची केली हत्या

point

एका वर्षापूर्वीचं प्रकरण पोलिसांनी काढलं बाहेर

Crime News : दिल्लीच्या गोइला गावातील वॉर्ड क्रमांक 78 मधील रहिवासी असलेल्या शिल्पा नावाच्या तरुणीने एका वर्षापूर्वी तिच्या पतीची हत्या केली होती. तिने तिच्या पतीचा मृतदेह हा एका गावातील नाल्यात फेकून दिला होता. या घटनेला एक वर्षे होऊन गेले. मात्र, एका वर्षानंतर या घटनेचा दिल्ली पोलिसांनी तपास करत खूनाचा छडा लावला आहे. या घटनेत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने पतीची हत्या केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

हे ही वाचा : धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

नेमकं काय घडलं? 

एका वर्षापूर्वी पतीने आपल्या पत्नीला एका तरुणासोबत पाहिलं होते. त्याला पाहताच महिलेचा पती त्याच्या मागेमागे धावू लागला, तसेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू लागला होता. यानंतर पती आणि संबंधित पत्नीत वाद उफाळू लागला होता. आरोपी प्रियकराने अनेकदा शिल्पाच्या घरी जाऊन गोंधळ घालायचा. कुटुंबाच्या दबावाखाली शिल्पा तिच्या पतीसोबत राहत होती, पण तिचं बाहेर परपुरूषासोबत अनैतिक संबंध होते.

ती अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जायची. गेल्या वर्षी म्हणजेच 14-15 ऑगस्ट रोजी शिल्पाने तिच्या पतीला एका निर्जनस्थळी नेलं. तेव्हा तिचा कथित बॉयफ्रेंड त्या ठिकाणी उपस्थित होताच. तिने तिच्या पतीवर हल्ला केला आणि नंतर तलवारीने त्याची हत्या केली. तिने पतीचा मृतदेह हा कपड्यात गुंडाळून ठेवून नाल्यात फेकून दिला.

या एकूण हत्येनंतर शिल्पा ही पूर्णपणे भयभीत झाली होती. या घटनेची माहिती कुणाला कळाल्यास, तसेच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यास तिला अटक केली जाईल याची तिला भिती होती. हत्येच्या या चा दिवसानंतर, किने पोलिसांना तिच्या बेपत्ता पतीचा शोध घेण्यास विनंती केली. पोलिसांनीही या हत्येचं गूढ समोर आणलं आणि दुसरा गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपीने चौकशीसाठी आरोपीला बोलावले, परंतु संबंधित प्रकरणाची कोणतीही ठोस माहिती अद्यापही समोर आली नाही.

हत्येचं गुढ उकललं

घटनेच्या एका वर्षानंतर, संबंधित प्रकरणाचा सखोल तपास केला असता, पोलिसांना गूढ उकलण्यात यश आलं आहे. डोके, कपडे, रक्ताचे डाग, पतीच्या बॅगेतील डेटा आणि मोबाईल तसेच मोबाईल प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरूनच खूनाचे ठिकाणी आणि मृतदेह नाल्यात फेकण्याचे कारण समोर आलं. संबंधित प्रकरणातील एकूण पुराव्यानुसार, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp