मुंबई: दाजीमुळे अल्पवयीन मेव्हणी झाली प्रेग्नंट, पत्नीसमोरच करायचा बलात्कार; पीडितने दिला बाळाला जन्म अन्..

Mumbai Rape Case :   मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोप करण्यात आलाय.

mumbai police arrested 40 year old man for raping his sister in law mumbai crime Shocking News

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

04 Aug 2025 (अपडेटेड: 05 Aug 2025, 09:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाऊजींची मेव्हणीवर होती वाईट नजर

point

पत्नीसमोरच मेव्हणीवर करायचा अत्याचार

point

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली

Mumbai Rape Case :   मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली. पत्नीवर आरोप करण्यात आले की, तिने तिच्या पतीचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला आणि घरातच तिच्या बहिणीची प्रसुती केली. पीडित तरुणीला जेव्हा रुग्णालायत दाखल करण्यात आलं, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. 

हे वाचलं का?

नराधमाने मार्च 2024 पासून अनेकदा केला बलात्कार

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी आणि दोन्ही आरोपी एकाच घरात राहतात. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, तिच्या भाऊजीने मार्च 2024 पासून यावर्षी जुलैपर्यंत अनेकदा तिच्यासोबत बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर पीडितेनं जेव्हा तिच्या मोठ्या बहिणीला याबाबत सांगितलं, तेव्हा तिने तिला शांत राहण्यासाठी सांगितलं.

हे ही वाचा >> धावत्या लोकलमधून चोरट्याने मोबाईल हिसकावला, प्रवाशाचा गेला तोल अन् पाय चिरडले, नेमकं ठाण्यात काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, मोठ्या बहिणीने तिच्या पतीचे कारनामे लपवण्यासाठी पीडितेला कधीही मेडिकल टेस्ट किंवा उपचारासाठी बाहेर पाठवलं नाही. तिने स्वत:च घरी तरुणीची डिलिव्हरी केली. पण जेव्हा तरुणीची तब्येत बिघडली, तेव्हा तिला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली

रुग्णालयातून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं की, तरुणी आणि तिचा मुलगा दोघेही स्थिर आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीवर गुन्ह्याची माहिती लपवणे, पुरावे नष्ट करणे आणि पीडितेला धमकी देण्याचा आरोप लावला आहे.

हे ही वाचा >> पत्नीचं बाहेर होतं लफडं, पतीला कळताच दोघांमध्ये झाला वाद, महिलेनं निर्जनस्थळी नेलं अन् ...

    follow whatsapp