Crime News: बिहारमधून विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. वहिनीसोबतच्या अनैतिक संबंधाला विरोध केल्यास एका तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोमवारी भोजपुर जिल्ह्यातील उदवंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत पियनिया गावात ही घटना घडली. येथे रात्रीच्या वेळी झालेल्या भांडणातून तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली. हत्येनंतर मुलीच्या मानेवर दोरीचे काळे डाग तसेच नाक आणि तोंडातून पांढरा फेस येत होता. यावरून मुलीचे आई-वडील दोरीने गळा दाबून मुलीची हत्या केल्याचा आरोप करत आहेत.
ADVERTISEMENT
फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तिथे तपास केला. तपास केल्यानंतर काही पुरावे गोळा करण्यात आले आणि महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मृत महिलेचे नाव अनिता देवी असून ती संदेश पोलीस स्टेशन परिसरातील जमुआंव गावातील रहिवासी रंजय साह यांची पत्नी होती.
पतीचे अनैतिक संबंध अन् सतत वाद
अनिता तिच्या पतीच्या वागण्याला कंटाळून जवळपास सहा वर्षांपासून आपल्या मुलांसोबत पियानिया येथे तिच्या माहेरी राहायला गेली होती. महिलेच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाला सुरूवात केली. या घटनेसंदर्भात अनिताच्या माहेरच्या मंडळींची चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपल्या नणंदेचं म्हणजेच अनिताचं लग्न बारा वर्षांपूर्वी झालं असून तिच्या पतीचे त्याच्या भावाच्या पत्नीसोबत म्हणजेच वहिनीसोबत जवळपास अडीच वर्षांपासून अवैध संबंध असल्याचं अनिताची वहिनी निशू देवीने सांगितलं. तसेच, अनिताचा पती तिला मारहाण देखील करायचा आणि घरखर्चासाठी पैसेसुद्धा देत नसल्याचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा: CM फडणवीसांना सलग दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर लागलं बोलावं, मंत्रिपद धोक्यात?
पतीला वैतागून पत्नी माहेरी गेली
याच कारणामुळे अनिता आणि तिच्या नवऱ्यामध्ये सतत वाद व्हायचे. यामुळे पाच वर्षांपूर्वी अनिता तिच्या माहेरी गेली आणि तेव्हापासून ती तिच्या माहेरी राहत होती. पाच महिन्यांपूर्वी तिच्या अनिताच्या आईचं निधन झाले. त्यानंतर तिचा पती रंजय साह देखील पियानिया गावात म्हणजेच अनिताच्या सासरी गेला आणि आपल्या पत्नीसोबत राहू लागला. सोमवारी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर घरातील सगळेच आपापल्या खोलीत गेले. त्यानंतर अनिता आणि तिच्या पतीमध्ये काही कारणीवरून वाद झाला. याच वादातून रंजयने त्याच्या पत्नीचा दोरीने गळा दाबून खून केल्याचा आरोप केला जात आहे.
हे ही वाचा: गुरूने आपल्या शिष्यालाही सोडलं नाही, किडनॅप करून लॉजवर नेलं, मुख्य आरोपीसह...हादरवून टाकणारं प्रकरण
रात्री नवरा-बायकोमध्ये वाद अन्..
मंगळवारी सकाळी घरातील सदस्य उठल्यानंतर त्यांना अनिताच्या खोलीची दरवाजा उघडा असलेला दिसला. आतमध्ये मुलं एका बाजूला झोपली होती आणि दुसऱ्या बाजूला अनिताचा मृतदेह त्यांना दिसला. त्यावेळी अनिताचा पती घरातून फरार होता. घरातील लोकांनी त्वरीत पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली. पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध केला असता रंजयने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप अनिताच्या वहिनीने केला. घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
