Crime News: क्रूरतेचा कळस! कुत्र्यासोबत अमानुष कृत्य करत तिसऱ्या मजल्यावरून फेकलं

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये क्रूरतेची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील कुत्र्यासोबत एका मध्यमवयीन व्यक्तीने बलात्कार केला आहे.

In Greater Noida Uttar Pradesh Man Allegedly Raped a female dog

In Greater Noida Uttar Pradesh Man Allegedly Raped a female dog

रोहिणी ठोंबरे

• 03:48 AM • 27 Oct 2023

follow google news

Greater Noida, Uttar Pradesh Crime News : दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) क्रूरतेची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावरील कुत्र्यासोबत एका मध्यमवयीन व्यक्तीने बलात्कार केला आहे. त्या व्यक्तीला कुत्र्यासोबत घाणेरडे कृत्य करताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. (In Greater Noida Uttar Pradesh Man Allegedly Raped a female dog and throw from 3rd Floor)

हे वाचलं का?

शेजाऱ्यांना समजल्यानंतर आरोपीने मादी कुत्र्याला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मूळचा मथुरा येथील असून बेटा 2 पोलीस स्टेशन हद्दीतील अल्फा 2 सेक्टरमध्ये भाड्याच्या घरात राहतो.

वाचा : इस्रायलने सिनवारसोबत हल्ल्याचा कट रचणाऱ्या हमास इंटेलिजन्सच्या उपप्रमुखाला केलं ठार!

आरोपीने एका स्थानिक कुत्र्याला रस्त्यावरून पकडून आपल्या खोलीत नेल्याचे सांगितले जात आहे. आरोपींनी कुत्र्याचे हात-पाय बांधले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. अचानक शेजारी राहणाऱ्या एका जोडप्याने आरोपीला घाणेरडे कृत्य करताना पाहिले आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

वाचा : Crime: मुंबईतील वासनांध, धावत्या लोकलमध्ये विवाहित महिलेसोबत..

कुत्र्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकले

गर्दी पाहून आरोपीने मादी कुत्र्याला टेरेसवर नेले आणि तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक करून, प्राणी क्रूरतेसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी केली.

वाचा : Ambernath Crime: मेव्हण्याने भाऊजीचं गुप्तांगच कापलं, कोयत्याने निर्घृण हल्ला; नेमकं काय घडलं?

मद्यधुंद अवस्थेत आरोपीने केला बलात्कार

मादी कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी पशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत स्थानिक बीटा 2 पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारी विनोद कुमार मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी एका खासगी बांधकाम कंपनीत काम करतो. घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता.

    follow whatsapp