लव्ह मॅरेजचा हट्ट, घरात सतत वाद... आई आणि भावाने मिळून केली तरुणीची निर्घृण हत्या! ऑनर किलिंगची भयानक घटना

मुंबई तक

• 11:54 AM • 25 Oct 2025

एका महिलेने तिच्या मुलासोबत आपल्याच मुलीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोन्ही आरोपींनी मृतदेह डॅममध्ये फेकून दिला.

ऑनर किलिंगची भयानक घटना

ऑनर किलिंगची भयानक घटना

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लव्ह मॅरेजचा हट्ट, घरात सतत वाद...

point

आई आणि भावाने मिळून केली तरुणीची निर्घृण हत्या!

point

ऑनर किलिंगची भयानक घटना

Crime News: गुजरातच्या भावनगरमधून ऑनर किलिंगची भयानक घटना समोर आली आहे. येथील भीकाडा गावात एका महिलेने तिच्या मुलासोबत आपल्याच मुलीची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी दोन्ही आरोपींनी मृतदेह डॅममध्ये फेकून दिला. मात्र, मृत तरुणीच्या वडिलांना या घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी आपली पत्नी आणि मुलाच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 

हे वाचलं का?

प्रियकरासोबतच लग्न करण्याचा हट्ट

तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, जवळपास एक वर्षापूर्वी त्यांच्या पारुल नावाच्या 22 वर्षीय मुलीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून विवेक नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर, ते दोघेही एकमेकांसोबत बोलायचे. त्यावेळी, अचानक त्यांचा मुलगा प्रकाश याने त्याच्या बहिणीला विवेकशी बोलताना पकडलं. पारुलने विवेकसोबत लग्न करण्याचा हट्ट धरला आणि याच कारणामुळे त्यांच्या घरात सतत वाद व्हायचे. पीडितेची आई दयाबेन आणि तिचा भाऊ तरुणीला सतत विवेकपासून दूर राहण्यास सांगायचे. 

मात्र, पारुलने विवेकसोबतच लग्न करण्याचा हट्ट सोडला नाही. खरंतर, या कारणामुळे पारुलच्या भावाचं लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे, घरात सतत भांडणं व्हायची. दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी पारुलला पुन्हा एकदा तिच्या आईने इंस्टाग्रामवर विवेकशी बोलताना पाहिलं. 

पीडितेला लव्ह मॅरेज करायचं होतं...

त्यानंतर, दयाबेनने तिच्या मुलाला फोन करून घरी बोलवून घेतलं आणि प्रकाश घरी आल्यानंतर दोघांनी पारुलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पीडितेने लव्ह मॅरेज केल्याने इतर दोन्ही मुलांच्या लग्नात अडचणी येऊ शकतात, असं देखील त्यांनी पारुलला सांगितलं. पण, तरुणीने तिच्या आई आणि भावाचं अजिबात ऐकलं नाही आणि ती विवेकसोबत पळून जाऊन लग्न करण्याची धमकी दिली. 

हे ही वाचा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बळजबरीने कारमध्ये बसवलं, नंतर फ्लॅटमध्ये नेऊन सामूहिक अत्याचार! पीडितेला चार दिवस...

पीडितेला चाकू लागल्याने जागीच मृत्यू 

त्यानंतर, संतापलेल्या आईने पारुलच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड बांधलं. तसेच, तिचा भाऊ प्रकाशने पारुलच्या गळ्यावर आणि शरीरावर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. त्यावेळी, पारुलच्या हातावर आणि कोपरावर चाकू लागला. खोल वार झाल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला आणि त्यात पारुलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, मृतदेह लपवण्यासाठी आई आणि मुलाने तो ताडपत्रीत गुंडाळला आणि तो विहिरीच्या जवळ झाडांच्या झुडपात लपवला.

हे ही वाचा: मोठी बातमी : फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी उचललं, PSI अजूनही फरार

अखेर, दोघांनी संधी साधून पारुलला मृतदेह डॅममध्ये फेकून दिला आणि तिथून ते पळून गेले. मृत तरुणीच्या वडिलांना या घटनेबद्दल कळताच त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मुलाला अटक केली.