Jaipur Crime News : ज्यूसमध्ये विष मिसळून पतीची हत्या केल्याच्या आरोपावरून एका महिलेला आणि तिच्या कथित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. महेश मीना असे मृत व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. त्याची पत्नी कविता मीना (वय 23) कथित प्रियकर गणेश मीना (वय 27) याच्यासोबत मिळून महेशच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
कविताने महेशला ज्यूसमधून विष दिल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, कविताने महेशला ज्यूसमधून विष दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सुरुवातीला महेशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानले जात होते. मात्र, नंतर परिस्थिती संशयास्पद वाटू लागल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात आला. ही घटना जयपूरमधून समोर आलीये.
हेही वाचा : '... नाही तर धनुष्यबाण गोठवा!', ठाकरेंच्या वकिलांची आतापर्यंतची सर्वात मोठी मागणी.. शिंदेंना बसणार झटका?
ज्यूस प्यायल्यानंतर महेशची प्रकृती बिघडली
पोलिसांच्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी कविताने औषध घेण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने महेशला मोटारसायकलवरून सोबत नेले. त्यानंतर तिने ज्यूसमध्ये विष मिसळून तो महेशला दिल्याचा आरोप आहे. ज्यूस प्यायल्यानंतर महेशची प्रकृती बिघडली. त्यानंतर कविताने गणेशला घटनास्थळी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी मिळून महेशला मोटारसायकलवरून एका पुलाच्या दिशेने नेल्याचा पोलिसांचा दावा आहे. हा प्रकार महेशचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे भासवण्यासाठी करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
यानंतर कविताने महेशचा भाऊ मनीष याला फोन करून महेशची प्रकृती बिघडल्याचे सांगितले आणि घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यानंतर महेशला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महेशच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत त्याच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. कवितासह तिच्या कथित साथीदारांचा महेशच्या मृत्यूमध्ये सहभाग असू शकतो, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, संबंधित पुरावे तपासले तसेच संशयितांची चौकशी केली. या तपासानंतर कविता मीना आणि गणेश मीना यांना अटक करण्यात आली. जयपूर पश्चिमचे पोलीस उपायुक्त प्रशांत किरण यांनी या कारवाईची माहिती दिली.
ADVERTISEMENT












