आधी मुलीला संपवलं, नंतर पत्नीला आणि मग स्वत:... बापानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 1 परिसरातील झूलेलाल मंदिर रोडवरील हर्षा कॉटेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं. पवन पाहुजा, त्यांची 16 वर्षीय मुलगी रोशनी आणि पत्नी नेहा असं हे कुटुंब होतं.

Mumbai Tak

मिथिलेश गुप्ता

16 May 2025 (अपडेटेड: 16 May 2025, 11:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये घडलेली घटना नेमकी काय?

point

बापानं अख्ख कुटुंब का संपवलं?

Thane Ulhasnagar Crime : ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कॅम्प क्रमांक 1 परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पित्याने आपल्याच मुलीची आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर आरोपी पित्यानं स्वतःही आत्महत्या केली आहे. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यानं बापानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 10 अल्पवयीन मुली गर्भवती, महाराष्ट्राला हादरवून टाकणारं बीडमधील नेमकं प्रकरण काय?

सहा वर्षाच्या मुलाचाही झाला होता मृत्यू 

उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 1 परिसरातील झूलेलाल मंदिर रोडवरील हर्षा कॉटेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं. पवन पाहुजा, त्यांची 16 वर्षीय मुलगी रोशनी आणि पत्नी नेहा असं हे कुटुंब होतं. पवन हे काही काळापासून आर्थिक संकटात होते. त्यामुळे ते नैराश्यग्रस्त झाले होते. याशिवाय, त्यांच्या सहा वर्षाच्या छोट्या मुलाचा सहा महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. पवन हे सोनार होते आणि ते सोनार गल्लीत सोनं तयार करण्याचं काम करत होते.

रात्री दीड वाजता केली पत्नी आणि मुलीची हत्या 

काल रात्री सुमारे दीड वाजता पवन यांनी त्यांची पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची गळा घोटून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. उल्हासनगर पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, पंचनामा करून मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. 

हे ही वाचा >> "अमित शाह घामाघूम होऊन मातोश्रीच्या दारात..." बाळासाहेबांच्या एका फोनमुळे ते वाचले, राऊतांच्या पुस्तकात गौप्यस्फोट!

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पवन यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात त्यांनी आर्थिक अडचणींमुळे हे टोकाचं पाऊल उचलत असल्याची माहिती समोर आलीये. सध्या उल्हासनगर पोलिसांनी अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) दाखल करून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp