तडीपार नवऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संपवले, कोणताच पुरावा ठेवला नाही; तरीही पोलिसांनी बायकोला कसे पकडले?

सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यूची वाटत होती. मृताला दारू पिण्याचे व्यसन होते. मात्र, जेव्हा मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यात आले, तेव्हा त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

Crime News

Crime News

मुंबई तक

10 Apr 2026 (अपडेटेड: 10 Apr 2026, 01:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हद्दपार नवऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संपवले

point

कोणताच पुरावा ठेवला नाही

point

तरीही पोलिसांनी बायकोला कसे पकडले?

Crime News : कानपूरमधील चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 एप्रिल रोजी 50 वर्षीय आशिष शर्मा यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक मृत्यूची वाटत होती. मृताला दारू पिण्याचे व्यसन होते. मात्र, जेव्हा मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यात आले, तेव्हा त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. आशिष शर्मा हे हमीरपूरचे रहिवासी होते. हद्दपार ठरवल्यानंतर ते कानपूरमध्ये राहत होते.

हे वाचलं का?

हमीरपूरमध्ये राहणारा मृताचा मुलगा लवकुश याने पोलिसांना माहिती दिली होती की, त्याचे वडील फोन उचलत नाहीत. जेव्हा तो पोलिसांसह घरी पोहोचला तेव्हा वडिलांचा मृतदेह घरात पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला. त्या अहवालात आशिष शर्मा यांची हत्या झाल्याचे समोर आले. यानंतर मुलाने वडिलांच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता

पोलिसांसमोर मोठे आव्हान हे होते की हत्येचा कोणताही स्पष्ट पुरावा मिळत नव्हता. तसेच त्यांची पत्नी आरती हमीरपूरमध्ये राहत असल्याने संशयही कमी होता. तपास पुढे नेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सुमारे 200 हून अधिक कॅमेऱ्यांच्या तपासणीनंतर पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला. एका फुटेजमध्ये दिसले की, मध्यरात्री एक महिला एका तरुणासोबत मृताच्या घरात प्रवेश करते आणि काही वेळाने तिथून निघून जाते.

हे ही वाचा : रिक्षा चालकावर जीव जडला, पत्नीने भयंकर कट रचला, बँक अधिकारी असलेल्या पतीला संपवलं

ती महिला कोण?

पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी एक पथक हमीरपूरला पाठवले. तिथे स्थानिक लोकांकडे चौकशी केल्यानंतर समजले की ती महिला दुसरी कोणी नसून मृताची पत्नी आरतीच आहे. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपी पत्नीने जो खुलासा केला तो अत्यंत धक्कादायक होता. तिने सांगितले की, तिचे हमीरपूरचा रहिवासी असलेल्या सबलू नावाच्या तरुणासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्याच्यासोबत मिळूनच तिने पतीला वाटेतून हटवण्याचा कट रचला होता.

हे ही वाचा : जालना : आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरे लग्न करत असल्याचा राग, मुलाने बापाला कुऱ्हाडीने वार करुन संपवलं

शेकडो किमीचा प्रवास अन् हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिलच्या रात्री आरती आपल्या प्रियकरासोबत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कानपूरला पोहोचली. तिचा पती रात्री दारूच्या नशेत असतो हे तिला माहित होते, त्यामुळे तिने याचाच फायदा घेतला. दोघांनी घरात घुसून गळा दाबून त्याची हत्या केली आणि त्यानंतर तिथून फरार झाले. हत्येनंतर आरोपी पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. तिने दावा केला की तिच्या पतीची हत्या घरमालकाने केली आहे. परंतु, जेव्हा पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा सत्य समोर आले.

हे ही वाचा : जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडून विद्यार्थीनींशी अश्लील चाळे, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार

आशिष शर्मा होता हद्दपार

पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत आशिष हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा (हिस्ट्रीशीटर) होता. 2022 मध्ये त्याने हमीरपूरच्या जंगलात फिरायला आलेल्या एका मुलीची छेडछाड केली होती, त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला हद्दपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो कानपूरमध्ये राहत होता. आरतीने पोलिसांसमोर सांगितले की, 'तो मला मारहाण करायचा. हमीरपूर फॉरेस्ट कांडात सबलू सुद्धा पतीसोबत तुरुंगात गेला होता. पती हद्दपार झाल्यानंतर माझी त्याच्याशी जवळीक वाढली होती.'

एडीसीपी अंजली विश्वकर्मा यांनी सांगितले की, आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे, तर तिचा प्रियकर अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. ही संपूर्ण घटना नियोजित पद्धतीने करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. आरोपी महिलेला तीन मुले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.