मित्रानं कॉफी पाजली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 03:20 PM)

Lucknow Gangrape Case: एका तरुणीला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. पीडिता दिल्लीत राहून UPSC ची तयारी करते.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्रानं दिलेली कॉफी प्यायली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त

point

UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?

Lucknow Crime News : एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला तीन दिवस डांबून ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी दिल्लीत राहून शिक्षण घेत असून ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत आहे. याप्रकरणी मुख्य संशयित आणि तिच्या ओळखीचा असलेला युवक शिवम यादव, त्याचा मित्र सनी यादव आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी तरुणीला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

हे वाचलं का?

व्हॉट्स्अॅपवर पाठवला मेसेज

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी सुट्ट्या घालवण्यासाठी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आपल्या मूळ गावी आली होती. सुट्ट्या संपवून ती सुहेलदेव एक्सप्रेसने दिल्लीला परत जाण्यासाठी निघाली. ट्रेन सुटल्यानंतर तिने गेल्या चार वर्षांपासून ओळखीचा असलेल्या शिवम यादवला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला. ही ट्रेन लखनऊच्या चारबाग स्थानकावर पोहोचताच शिवम आणि त्याचा मित्र सनी यादव तिथे आले. त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिचे मन वळवले आणि ट्रेनमधून उतरण्यास भाग पाडले आणि एका अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले.

हे ही वाचा : बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न, पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!

कॉफी पाजली अन्..

 फ्लॅटमध्ये नेऊन शिवमने तरुणीच्या कॉफीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळल्या आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ मे रोजी शिवम घरात नसताना सनी यादव याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. संशयित आरोपी जेव्हा जेव्हा बाहेर जात, तेव्हा फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून जात असत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 17 मे रोजी त्या फ्लॅटमध्ये तिसरा अज्ञात व्यक्ती आला. या तिघांनी मिळून 18 मेच्या दुपारपर्यंत तिला तिथे डांबून ठेवले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर 18 मे रोजी दुपारी त्यांनी पीडितेला पुन्हा चारबाग रेल्वे स्थानकावर नेऊन दिल्लीला जाणाऱ्या सुहेलदेव एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये बसवून दिले.

हे ही वाचा : आधी सांगितलं बायको पळाली, नंतर गर्लफ्रेंडच्या घरात.., नेमकं काय घडलं?

आरोपींचा एन्काऊंटर करा

ट्रेन बरेली स्थानकाजवळ पोहोचत असताना पीडित तरुणीने फोनवरून वडिलांशी संपर्क साधून आपल्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी तात्काळ रेल्वे हेल्पलाइनवर संपर्क साधला, ज्यानंतर सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) ट्रेनमध्येच तिचा शोध घेऊन तिला मदत केली. त्यानंतर तिला दिल्लीतील आनंद विहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथे तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत 'झिरो एफआयआर' नोंदवण्यात आला. या घटनेमुळे पीडित तरुणी तीव्र धक्क्यात असून, आरोपींना एन्काउंटरमध्ये ठार मारून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. लखनौ पोलिसांनी 'झिरो एफआयआर' प्राप्त झाल्याचे सांगत आरोपींना अटक करण्यासाठी अनेक पथके रवाना केली आहेत.