प्रपोज केल्यानंतर तरुणीने नकार दिला, तरुणाच्या पचनी पडेना; थेट घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला

Petrol bomb attack : मुलीने नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तिच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Crime News

Crime News

मुंबई तक

26 May 2026 (अपडेटेड: 26 May 2026, 11:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रेपोज केल्यानंतर तरुणीने नकार दिला

point

तरुणाच्या पचनी पडेना; थेट घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला

Petrol bomb attack : सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर एका गंभीर आणि हिंसक घटनेत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका 21 वर्षीय तरुणीला तिच्या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. ही तरुणी एका खासगी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून, तिची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चेन्नईतील 'कार्थी' नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात बदलण्याचा प्रयत्न कार्थीने केला, परंतु तरुणीला जेव्हा त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा तिने सावध पवित्रा घेतला. कार्थीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजताच तिने कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याऐवजी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आणि त्याला स्पष्टपणे नकार दिला.

हे वाचलं का?

हेही वाचा : बार्शी : प्रेमविवाह अन् सोनेरी स्वप्न, पण बिअर बारसमोर संसाराची राखरांगोळी!

मुलीने नकाराचा राग आणि पेट्रोल बॉम्बचा भ्याड हल्ला

तरुणीने दिलेला नकार कार्थीला अजिबात पचनी पडला नाही. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हिंसक मार्ग अवलंबण्याचे ठरवले. शनिवारी सायंकाळी कार्थी आपल्या काही साथीदारांसोबत दुचाकीवरून तरुणीच्या घरापर्यंत पोहोचला. अत्यंत क्रूरतेने या टोळीने तरुणीच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेट्रोल बॉम्ब फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि परिसरात भितीचे वातावरण पसरले. पेट्रोल बॉम्ब फेकल्यानंतर हल्लेखोर आपल्या दुचाकींवरून तातडीने घटनास्थळावरून पसार झाले. या भ्याड हल्ल्यात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे तरुणीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, 23 जिल्ह्यांना अलर्ट

घटनेची माहिती मिळताच कोईम्बतूरमधील थोंडामुथुर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असून प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोर कार्थी आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाकडून झालेला हा हल्ला महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सोशल मीडियावरील मैत्री करताना किती सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस सर्व तांत्रिक पुराव्यांचा वापर करत असून लवकरच या टोळीला जेरबंद केले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण खळबळजनक प्रकरणाची नोंद कोइम्बतूरमधील थोंडामुथुरजवळील 'कलिक्कानाइकेनपालयम' येथे करण्यात आली आहे.