Crime News : मुरादाबादमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. महिलेचं आपल्याच भाच्यासोबत प्रेमसंबंध होते. नवरा आडकाठी येत होता, म्हणून तिने त्याला करंट दिला, ती केवळ इथनवर न थांबता तिने त्याला विष पाजलं आणि हत्या केली. हा अपघात असल्याचा बनाव रचून मृतदेह पायऱ्यांवरून खाली फेकून दिला. या प्रकरणात महिला, बहीण आंचल, तिचा बॉयफ्रेंड अजय आणि पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मे महिन्याच्या 'या' तारखेपासून केतूची हालचाल, या राशींचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता
हे प्रकरण मझोला पोलीस ठाणे क्षेत्रानजीक ढक्का परिसरातील आहे. निकटवर्तीयांच्या म्हणण्यांनुसार, रात्री घरात कसली तरी हालचाल सुरू ऐकू आली होती, मात्र अशी गंभीर घटना घडेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. थोड्याच वेळानंतर पवनने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती सगळीकडे पसरली. या दुर्दैवी घटनेनं घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांना या प्रकरणी भलताच संशय आला होता. ते जेव्हा घटनास्थळी दाखल झाले असता, पोलिसांनी सुरूवातीच्या घटनांवरून गडबड झाल्याचा संशय आला. तसेच शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. हे प्रकरण केवळ जिन्यावरून पडल्याचे वाटत नव्हते. शवविच्छेदन आणि प्राथमिक तपासातून या प्रकरणाचा उलगडा झाला.
मृत पवनचं आंचलशी विवाह
मृत पवनने सहा वर्षांपूर्वी आंचलशी लग्न केले होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी देखील होती, त्यांच्याच जवळच्या लोकांच्या मते, सुरुवातीला सर्व काही ठीक होते, मात्र काही काळापासून दोघांमधील वाद वाढू लागला होता. तपासातून उघडकील आले की, आंचलचे तिचा चुलत भाऊ अंकितासोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्यांची जवळीकता इतकी वाढली की पवनला भलताच संशय आला होता. घरात अनेकदा वाद विवाद होऊ लागले होते. पवनने वारंवार याचा निषेध देखील केला होता, मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडू लागली.
महिलेनं नवऱ्याला करंट देऊन विष पाजलं अन्...
दरम्यान पुढे असा आरोप करण्यात आला की, घटनेच्या दिवशी चारही आरोपी पवनला संपवण्याचा कट रचला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी सर्वात अधी विष देण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिकार केल्यानंतर त्याला बांधून त्याची निर्घृणपणे हत्या केली. नंतर तिच्या नवऱ्याला करंट दिला, पवन जवळपास तीन तास वेदनेने व्हिवळत होता. याची प्रकृती अधिक खालावली, तेव्हा आरोपींनी त्याला पुन्हा विष दिले. त्याचा मृत्यू झाल्यावर, संबंधित आरोपींनी ही आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या माहितीनुसार, विष प्राशन केल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या प्रकरणी लोकांचा विश्वास बसावा यासाठी मृतदेह जिन्यावरून खाली ढकलण्यात आला.
पवनच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पवनला आधीपासूनच भीती होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी बहिणीला फोन करून सांगितलं की, घरातील परिस्थिती व्यवस्थित नाही आणि त्याला कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत असल्याची भीती त्यांना होती. या प्रकरणी आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, आरोपीचे जबाब वारंवार बदलत होते. मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांनीही पोलिसांचा संशय आला. त्यानंतर, सखोल तपासानंतर संपूर्ण कट उघडकीस आला होता.
हे ही वाचा : अशा मित्रापेक्षा शत्रू बरा! जिगरी मित्राच्या बायकोवर नजर,..शेवटी काय घडलं?
वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतपाल यांनी सांगितलं की, मझोला पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तपासातून उघडकीस आले की, पवनची हत्या त्याची पत्नी आंचल, प्रियकर अंकित, तिची बहीण शिखा आणि प्रियकर अजय यांनी केली. पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळून त्यांना न्यायालयात हजर केले. या प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दरम्यान, पोलीस मोबाईल, चॅट्स, कॉल रेकॉर्डिंग आणि घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुराव्यांची तपासणी करत आहेत.
ADVERTISEMENT











