Crime News : बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला असून, या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. ही कथित घटना 3 एप्रिल रोजी घडली होती, मात्र धक्कादायक बाब म्हणजे या घटनेची एफआयआर घटनेच्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर, म्हणजेच 7 मे रोजी दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT
महिनाभरानंतर दाखल झाला एफआयआर
बेलसंड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, सात मे रोजी एफआयआर नोंदवल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून रविवारी मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला. ते म्हणाले, "जरी हा कथित बलात्कार आणि हत्या तीन एप्रिल रोजी झाली असली, तरी पोलिसांना या घटनेची माहिती महिनाभरानंतर मिळाली. हे प्रकरण जुने असल्याने आणि मृतदेह आधीच दफन करण्यात आल्यामुळे, तो बाहेर काढण्यासाठी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली. न्यायालयाची परवानगी मिळताच ही कारवाई करण्यात आली आहे."
हे ही वाचा : रात्री सगळे गाढ झोपले, सकाळी चिमुकलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग; कुणी केले अत्याचार?
आई शेतातून घरी परतली अन्..
या प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये एकूण पाच जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास जेव्हा मुलीची आई शेतातून घरी परतली, तेव्हा तिला आपली मुलगी लाकडी पलंगावर गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या गळ्याला ओढणी बांधलेली होती आणि त्या ओढणीचे दुसरे टोक छताच्या बांबूच्या खांबाला अडकवलेले होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपींनी मुलीच्या आईच्या संमतीशिवाय आणि मुंबईत मजूर म्हणून काम करणारे तिचे वडील घरी परतण्यापूर्वीच मृतदेह गावातील दफन केला.
हे ही वाचा : जनगणना अधिकाऱ्यांना बघताच सटकली, काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं
पोलिसांनी काय सांगितले?
मृतक मुलीच्या मामाच्या एका नातेवाईकाने आरोप केला आहे की, आरोपींपैकी एकाला पीडित मुलीशी लग्न करायचे होते आणि तो तिला सतत त्रास देत होता. या छळातूनच हा सर्व प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. बेलसंड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही सध्या फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहोत. मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा आणि फॉरेन्सिकचा अहवाल हाती येताच आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करू आणि दोषींवर कडक कारवाई करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करू."
ADVERTISEMENT











