बडतर्फ पोलीस 'त्या' महिलेला घरी आणायचा, शेजाऱ्यांना खटकायचं; शेवटी तिघांचा मर्डर

Haryana Triple Murder Case: आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला करून एका दाम्पत्यासह तिघांची निर्घृण हत्या केली. अवैध संबंधांच्या वादातून ही खळबळजनक घटना घडली असून, आरोपी दिल्ली पोलिसांतून बडतर्फ झालेला सुरक्षा रक्षक आहे.

 Crime News

Crime News

मुंबई तक

25 May 2026 (अपडेटेड: 25 May 2026, 04:53 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

निवृत्त पोलीस 'त्या' महिलेला घरी आणायचा

point

शेजाऱ्यांना खटकायचं; शेवटी तिघांचा मर्डर

Haryana Crime News : अनैतिक संबंधामुळे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत रविवारी रात्री रक्तरंजीत कांड झालेले पाहायला मिळाले. आरोपीने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राच्या साहाय्याने एकाच कुटुंबातील आणि परिसरातील तीन जणांचा जीव घेतला. मृतांमध्ये विजय (वय 50) आणि त्यांची पत्नी सुनीता (वय 47) या दांपत्याचा समावेश असून, स्वाती (वय 32) ही तिसरी मृत महिला आहे. या तिघांचीही अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून तातडीने फरार झाला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मे महिन्याच्या 'या' तारखेपासून केतूची हालचाल, या राशींचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता

आरोपी अजूनही फरार, अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत तपास सुरू केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.  प्रयोगशाळेच्या (FSL) पथकाने घटनास्थळावरून तांत्रिक पुरावे आणि महत्त्वाच्या खुणा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथके (Special Investigation Teams) नेमली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

शेजाऱ्यांना त्याच्या अनैतिक संबंधांवर आक्षेप

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी ब्रह्म प्रकाश याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच अनैतिक  संबंधांवरून शेजाऱ्यांनी त्याला अनेकदा जाब विचारला होता. शेजाऱ्यांना त्याच्या अनैतिक संबंधांवर आक्षेप होता. या वादातूनच रविवारच्या रात्री तणाव विकोपाला गेला. ब्रह्म प्रकाशने अत्यंत हिंसक पवित्रा घेत विजय आणि सुनीता यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. यावेळी जवळच असलेली स्वाती ही महिला आडवी आली असता, आरोपीने तिच्यावरही वार केले. आरोपी ब्रह्म प्रकाश हा दिल्ली पोलिसांतून बडतर्फ झालेला कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, तो स्वभावाने अत्यंत आक्रमक होता. तो सध्या एका खासगी शाळेत सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस त्याच्या अटकेसाठी सर्व संभाव्य ठिकाणांवर पाळत ठेवून आहेत.

या अमानवी कृत्यामुळे मृतकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादाच्या आणि ओरडण्याच्या आवाजामुळे शेजारी जागे झाले होते, परंतु आरोपी इतका हिंसक होता की, कोणालाही काही समजण्याच्या आत त्याने तिघांचा बळी घेतला. मृत विजय आणि सुनीता हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, तर स्वाती दुसऱ्या मजल्यावर राहत होती. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आपसी वादातून घडलेल्या या तिहेरी हत्येच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. ही संपूर्ण दुर्दैवी घटना हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कुंडली येथील टीडीआय (TDI) सिटीमधील बीपीएल (BPL) फ्लॅट्समध्ये घडली आहे.