अशा मित्रापेक्षा शत्रू बरा! जिगरी मित्राच्या बायकोवर नजर,..शेवटी काय घडलं?

मुंबई तक

25 May 2026 (अपडेटेड: 25 May 2026, 02:38 PM)

Crime News : एका विवाहित महिलेने पतीच्या मित्रासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा राडा झाला. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात चार तास हाय-व्होल्टेज ड्रामा रंगला.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अशा मित्रापेक्षा शत्रू बरा! जिगरी मित्राच्या बायकोवर नजर

point

,..पोलीस ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा!

Crime News : नातेवाईक निवडणे आपल्या हाती नसते. पण मित्र आपण निवडत असतो. मित्र आपल्या आनंदी जीवनाचा भाग असतात. मात्र, सध्या एक धक्कादायक प्रकार चर्चेत आलाय. या घटनेने मैत्रीच्या नात्याला काळिमा फासलीये. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात... 

हे वाचलं का?

तरुणाने जिवलग मित्राच्या पत्नीला पळवून नेलं

एका तरुणाने आपल्याच जिवलग मित्राच्या पत्नीला पळवून नेल्याने दोन कुटुंबांत मोठा संघर्ष पेटला आहे. या प्रेमसंबंधांची माहिती मिळताच दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आणि वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. एका गटाने तर दुसऱ्या गटाच्या घरावर चाकू घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केल्यावर पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करून पोलीस ठाण्यात नेले.

हेही वाचा : सुखी संसाराचे सोनेरी स्वप्न, पण बायकोचा मोबाईल हाती घेतला अन् झोप उडाली

महिला पोरा-बाळासह प्रियकरासोबत राहण्यावर ठाम 

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले. महिला आणि तिचा प्रियकर तिथे उपस्थित असताना दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू केले. सामाजिक बंधने झुगारून त्या महिलेने सर्वांसमोर आपल्या प्रियकरासोबतच राहण्याचा ठाम निर्णय जाहीर केला. ती आपल्या मुलासह प्रियकराकडे जाण्यावर ठाम राहिल्याने उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. तिच्या या निर्णयानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वादविवाद, शिवीगाळ आणि गोंधळ सुरू झाला.

हेही वाचा : आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ 800 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

हा हाय-व्होल्टेज ड्रामा पोलीस ठाण्यात तब्बल चार तास सुरू होता. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण वादाची तीव्रता इतकी मोठी होती की परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. कुटुंबीयांचा आक्रोश आणि दोन्ही बाजूंनी होणारे आरोप यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलीस अधिकारी शांतपणे या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी परिस्थिती हाताळत होते, अखेर खूप वेळ चर्चेनंतर आणि समजावल्यानंतर हा गोंधळ थांबला.

नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पूर्णपणे सज्ञान असून तिने लेखी आणि तोंडी स्वरूपात आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कायद्यानुसार सज्ञान व्यक्ती स्वतःचा जोडीदार निवडण्यास स्वतंत्र असल्याने पोलिसांनी तिची इच्छा मान्य करत हे प्रकरण शांत केले. ही संपूर्ण थरारक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या नगर पोलीस ठाणे हद्दीतील नाला रोड परिसरात घडली आहे.