केतनच्या हत्येपूर्वी सियाचे चेतनशी सिक्रेट लग्न, साक्षीदार म्हणून मित्रांची स्वाक्षरी

मुंबई तक

• 06:07 PM • 07 Jul 2026

Ketan Agrawal Case : पुणे लोहगड हत्याकांड प्रकरणी दिवसेंदिवस मोठे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. सिया गोयलने केतन अग्रवालसोबत साखरपुडा झाल्यानंतर प्रियकर चेतनसोबत गुपचूप विवाह केल्याची माहिती आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तापस करत आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरीने 4 महिन्यापूर्वी स्थानीय रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये कोणालाही न सांगता विवाह केला होता.

Ketan agrawal case

Ketan agrawal case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सियाच्या दोन मित्रांची लग्नात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी

point

लग्नातील फोटोचा तपास सुरू

Ketan Agrawal Case : पुणे लोहगड हत्याकांड प्रकरणी दिवसेंदिवस मोठे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत. सिया गोयलने केतन अग्रवालसोबत साखरपुडा झाल्यानंतर प्रियकर चेतनसोबत गुपचूप विवाह केल्याची माहिती आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तापस करत आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरीने 4 महिन्यापूर्वी स्थानीय रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये कोणालाही न सांगता विवाह केला होता. अशातच पोलीस त्या लग्नाच्या सर्टिफिकेटचा देखील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी सियानं बरंच काही केलं सर्च, पोलिसांनी डोकं धरलं

सियाच्या दोन मित्रांची लग्नात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी

वृत्त माध्यमानुसार, सिया गोयलचे कॉलेजचे दोन मित्र या लग्नात होते. कथितरित्या त्यांनी रजिस्टर ऑफिसमध्ये लग्नाचे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी देखील केली. संबंधित अहवालात दावा करण्यात आला की, सिया आणि चेतनच्या लग्नाचा फोटो सियाच्या एका खाजगी इंस्टाग्राम आयडी अकाउंटवर शेअर करण्यात आला होता. परंतु नंतर तो हटवण्यात आला. 

लग्नातील फोटोचा तपास सुरू

अशातच पोलीस तपास करून दोघांच्याही लग्नाचे फोटो शोधून काढण्याचे काम करत आहेत. विवाह कायद्यानुसार, विवाहाबाबत सर्वांना का सांगितलं गेलं नव्हतं. गुप्त विवाह घाईघाईने घडवून आणण्यासाठी मध्यस्तींना पैसे दिले होते का? दिले असतील तर किती पैसे दिले असावेत? याचा तपास सुरु आहे. 

हे ही वाचा : विवाहित महिलेचं भाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर दोघांचाही मृत्यू

सिया गोयल आणि केतन अग्रवालचा विवाह हा नोव्हेंबरमध्ये होणार होता. मात्र 18 जून रोजी केतन अग्रवाल पाण्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून मृत पावला. लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सियाने कारण सांगून केतनची जीव घेतला. सियाने रचलेला एक भन्नाट कट असल्याचं बोललं जातंय.