कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या

Kolhapur News : कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या

Mumbai Tak

मुंबई तक

17 Oct 2025 (अपडेटेड: 17 Oct 2025, 04:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरातील 6 नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

point

एकाच वेळी सहा जणींनी हाताच्या नसा कापल्या

Kolhapur News : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. महिला सुधारगृहात राहणाऱ्या सहा नृत्यांगनांनी एकत्रितपणे आत्महत्येचा प्रयत्न केला. सहा नृत्यांगणांनी आपल्या हाताच्या नसा कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वेळेवर ही बाब लक्षात आल्याने सुधारगृह प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सर्वांना रुग्णालयात दाखल केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : पतंग आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडला, परत येताना आनंद गगनात मावेना; पण 9 वर्षीय कनिष्कासोबत आक्रित घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी केलेल्या छापेमारीदरम्यान या सहा नृत्यांगनांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी सामूहिकरीत्या आत्महत्येचा प्रयत्न करत स्वतःच्या हाताच्या नसा कापल्या. परंतु प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्या जीवावर आलेले संकट टाळले. सध्या सर्व नृत्यांगना रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर: देशाची वॉटरफ्रंट राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार! वांद्रेतील 140 जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट...

सहा नृत्यांगणांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हाताच्या नसा कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच याबद्दलची माहिती महिला सुधारगृहात पसरली. त्यांना तातडीने जवळच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सहा जणांनी मिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? सामुहिक आयुष्य संपवण्यामागचं कारण काय? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मॉर्निंग वॉकला गेलेल्या आईला पाहण्यासाठी चिमुकली गॅलरीकडे धावली, 7 व्या मजल्यावरुन खाली पाहिलं अन्..

    follow whatsapp