सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला, सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं

daughter in law corpse shock woman also died : सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला, सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं

Mumbai Tak

मुंबई तक

16 Oct 2025 (अपडेटेड: 16 Oct 2025, 11:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला

point

सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं

daughter in law corpse shock woman also died : सुनेचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहावर नजर पडताच सासूला एवढा जबर धक्का बसला की काही क्षणातच तिचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून दोघींच्या अंत्ययात्रा एकाच घरातून एकाच वेळी निघाल्याने पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अजमेर जिल्ह्यातील सरवाड कसब्यात घडलेली ही घटना हृदयद्रावक आहे. सासू-सुनेच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

सासू-सुनेच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव हळहळलं 

अधिकची माहिती अशी की, अजमेर जिल्ह्यातील सरवाड येथील नाथ मोहल्ल्यात सुनील भटनागर यांचे कुटुंब राहते. सुनील यांच्या पत्नी अनिता भटनागर (वय 42) गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर भीलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी अनिताची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह अँब्युलन्समधून सरवाड येथे आणण्यात आला.

हेही वाचा : '...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला

घरात अनीताचा मृतदेह पोहोचताच त्यांच्या सासू अन्नपूर्णा देवी (वय 70) सुनेला पाहून शोकाकुल झाल्या. त्या सुनेच्या पार्थिव देहाजवळ बसून रडत होत्या. घरच्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण अचानक त्या भोवळ येऊन पडल्या. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अनिताच्या मृत्यूने आधीच दुःखात बुडालेल्या कुटुंबावर सासूच्या निधनाने दुहेरी आघात झाला. एकाच दिवशी सासू-सुनेच्या मृत्यूने नाथ परिसरात हळहळ पसरली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अन्नपूर्णा देवी आणि अनीता यांचे नाते अतिशय प्रेमळ होते. दोघी एकमेकींशी आई-मुलीसारख्या राहायच्या. त्यामुळे सुनेच्या मृत्यूचा धक्का अन्नपूर्णा देवी सहन करू शकल्या नाहीत. गुरुवारी सकाळी या दोघींची अंतयात्रा एकाच घरातून एकाच वेळी निघाल्या. गावातील सर्वांनी अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेने संपूर्ण सरवाड गावात शोककळा पसरली असून, सर्वजण या आई-मुलीसमान सासू-सुनेच्या एकमेकींबद्दलच्या प्रेमाची चर्चा करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापुरात मन सुन्न करणारी घटना, दारु प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने सावत्र आईच्या डोक्यात खलबत्ता घातला

 

    follow whatsapp