कोल्हापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र मुलाने आईचा खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगरमधील साळोखे पार्क परिसरातील भारतनगर येथे घडली. मृत महिलेचे नाव सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) असे असून, आरोपी मुलगा विजय अरुण निकम (वय 35) याला राजारामपुरी पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीही 10 वर्षांपूर्वी सोडून गेली
अधिकची माहिती अशी की, कोल्हापूरच्या भारतनगरातील साळोखे पार्क परिसरात राहणाऱ्या सावित्रीबाई अरुण निकम (वय 53) यांची त्यांच्या सावत्र मुलाने, विजय अरुण निकम (वय 35) दारूच्या पैशासाठी झालेल्या वादानंतर क्रूरपणे हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सावित्रीबाई महाद्वार रोडवर किरकोळ वस्तू विकायच्या आणि विजय अधूनमधून सेंट्रिंग व डिजिटल फलक पेस्टिंगचे काम करायचा; त्याला मद्यपानाची सवय होती. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नी भाग्यश्री ही 10 वर्षापूर्वी विजापूर इथं माहेरी निघून गेली.
हेही वाचा : '...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला
घटनेच्या आधी मंगळवारी रात्री आई-मुलामध्ये भांडण झाले होते. बुधवारी सकाळी विजयने आईकडून दारूसाठी पैसे मागितले; पैसे न मिळाल्याने तो रागावर येऊन घरात राहणाऱ्या खलबत्त्याने सावित्रीबाईंच्या डोक्यावर वार केले आणि त्यांचा जीव घेतला. या हल्ल्याने तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्त ओघळ पडून परिसरात भयावह दृष्य निर्माण झाले.
आईचा खून केला आणि बहिणीला फोन करुन सांगितलं
आईवर हल्ला केल्यानंतर विजयने इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. स्थानिक जनता ही घटना लक्षात येताच राजारामपुरी पोलिसांना कळविली; पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला अटक केली आणि पंचनामा नोंदवला. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाच्या बहिणी रोहिणी जयवंत पोर्लेकर (29, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोस्टमॉर्टेम करण्यासाठी मृतदेह पोलिसांनी रवाना केला. दरम्यान, आईचा खून केल्यानंतरही आरोपी मुलगा दारात बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडासाठी पश्चाताप दिसत नव्हता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray: 'आज अजित पवारांनीही यायला हवं होतं', शेवटची ओळ अन् राज ठाकरेंनी दादांना का डिवचलं?
ADVERTISEMENT
