Pune News : दिवाळी काही दिवसांवर आली असून सगळीकडे सणासुदीचा माहोल सुरू आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी, सजावट, खरेदी आणि उत्साह या सगळ्याचं अनोखं आकर्षण असतं. मात्र, या उत्साहात सोशल मीडियावर फटाका स्टॉलचं प्रमोशन करण्याच्या नादात एका रिल्स स्टारला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.
ADVERTISEMENT
वाकड परिसरातील एका रिल्स स्टारने फटाक्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी हटके मार्ग अवलंबला. दिवाळीपूर्व काळात लक्ष वेधण्यासाठी त्याने सोशल मीडियावर गुन्हेगारी ज्या पद्धतीने वागतात, तशा पद्धतीने शूट केलेले रिल्स टाकले. या व्हिडिओमध्ये फटाक्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी बंदुका, धोकादायक पोझेस आणि गुन्हेगारी पद्धतीचा अभिनय दाखवण्यात आला होता. हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याकडे पोलिसांचं लक्ष गेलं. वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या रिल्स स्टारला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्याला अशा प्रकारचं प्रमोशन करणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचं असून समाजात चुकीचा संदेश जातो, अशी समज पोलिसांनी दिली. यानंतर त्याने आपली चूक मान्य करत व्हिडिओ डिलीट केल्याचं सांगितलं.
हेही वाचा : 3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप
पोलिसांनी उचलल्यानंतर रील स्टारचं आवाहन
दरम्यान, पोलिसांनी उचलल्यानंतर रील स्टार म्हणाला, माझ्याकडून चुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे वाकड पोलिसांनी मला समज दिली आहे. कृपया कोणी असे व्हिडीओ बनवू नये. अन्यथा वाकड पोलीस योग्य पद्धतीने समज देतील. वाकड पोलीस स्टेशन जिंदाबाद...!
पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना अशा प्रकारच्या रिल्स तयार करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. फटाके विक्रीसाठी अथवा इतर कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीसाठी सोशल मीडियावर अशा हिंसक किंवा गुन्हेगारी शैलीतील प्रमोशन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दिवाळीचा सण आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा प्रतीक आहे. मात्र, प्रसिद्धीच्या नादात आणि ‘लाइक-फॉलोअर्स’च्या मोहात गुंतून चुकीचा मार्ग स्वीकारल्यास तोच आनंद संकटात बदलू शकतो, असा धडा या घटनेतून मिळतो. वाकड पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरातील इतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्येही सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Viral News: पुण्याची वाट लागली... नदीपात्रातील हाणामारीचा 'हा' Video आणेल तुमच्याही अंगावर काटा
ADVERTISEMENT
