Sexual Assault Case: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील यूनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित पीडितेने चार लोकांवर शारीरिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
12 ऑक्टोबर रोजी दुपारी जवळपास तीन वाजताच्या सुमारास मैदानगढ पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना एक पीसीआर कॉल आला आणि त्यावेळी साउथ एशियन यूनिव्हर्सिटीमध्ये बी.टेक (B.tech) च्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती देण्यात आली.
पीडितेचे कपडे फाडले अन् घृणास्पद कृत्य
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासादरम्यान, चार तरुण पीडितेला ऑडिटोरिअमजवळील एका परिसरात घेऊन गेले. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना याबद्दल माहिती देताना सांगितलं की, चार आरोपी तरुणांनी तिचे कपडे फाडले आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली. त्यांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर, ती कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटून बाहेर आली आणि स्थानिकांकडे मदतीची याचना करू लागली. दरम्यान, या घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली.
हे ही वाचा: तब्बल 10 कोटी इनाम डोक्यावर असलेला नक्षलवादी CM फडणवीसांसमोर टाकणार शस्त्र खाली!
पीडितेची वैद्यकीय तपासणी
संबंधित घटनेनंतर, पीडिता खूप घाबरली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पीडितेला रुग्णालयात नेलं आणि तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या, पोलीस आरोपींची शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: 3 एकर जमिनीवर 3 कोटींचं कर्ज दाखवलं, वसुलीसाठी जमिनीचा लिलाव, अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा प्रताप
या घटनेमुळे महाविद्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध निषेध जाहीर केला आहे. तसेच, कॉलेज कॅम्पसमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्याने महिला विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात यावी आणि कॉलेज प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलावे, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
