Crime News: दिल्लीतील दक्षिण एशियाई यूनिव्हर्सिटी (SAU) येथे शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यासंबंधी पीडितेने हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत रविवारी संध्याकाळी यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये चार अज्ञात पुरूषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं तिने सांगितलं.
ADVERTISEMENT
तक्रार फेटाळून लावल्याचा दावा
दाखल झालेल्या एफआयआर नुसार, वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करण्याऐवजी किंवा याबाबत अधिकाऱ्यांना कळवण्याऐवजी, तिची तक्रार फेटाळून लावली. तसेच, तिला तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यापासून रोखलं आणि घटनेनंतर तिला आंघोळ करून कपडे बदलण्याचा सल्लाही दिला. पोलिसांकडे या प्रकरणाबाबत तक्रार करताना पीडितेने ती शिकत असलेल्या यूनिव्हर्सिटीवर गंभीर आरोप केले. कॉलेज स्टाफने पीडितेची तक्रार फेटाळून लावल्याचा दावा पीडितेने केला. पीडितेने याबाबत सांगितलं की हॉस्टेल इन्चार्जने सुरुवातीला तिला मदत करण्याऐवजी तिला दोष दिला. हॉस्टेल इन्चार्जने याउलट पीडितेला सांगितलं की "मुलींना बरेच बॉयफ्रेंड्स असतात आणि ते मुलांना त्यांच्या खोल्यांमध्ये आणू शकतात."
पीडितेने यावर आरोप करताना सांगितलं की, तिची तब्येत बिघडल्यानंतर सुद्धा हॉस्टेलच्या इंचार्जने काहीच चिंता दाखवली नाही. याउलट, अधिकाऱ्याने तिला आंघोळ करायला आणि कपडे बदलण्यास सांगितलं. पीडितेची गंभीर अवस्था असून सुद्धा कर्मचाऱ्याने पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची किंवा तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही.
हे ही वाचा: दोन मुलांची आई प्रियकरासोबत पळून गेली! पाच वर्षांनंतर, 'त्या' गोष्टीमुळे पुन्हा घरी आली अन्... नेमकं प्रकरण काय?
अश्लील आणि धमकीचे मॅसेजेस
पीडितेला अश्लील आणि धमकीचे मॅसेजेस मिळाले होते आणि त्यानंतर, तिला हॉस्टेलमधून बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी रात्री यूनिव्हर्सिटीच्या दीक्षांत केंद्राजवळ चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सामूहिक बलात्काच्या या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितांची ओळख पटवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपींविरुद्ध बऱ्याच कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू असून पथके आरोपींची ओळख पटवण्यासाठी कार्यरत आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 'मोटर वाहन ॲग्रीगेटर ड्राफ्ट'मधील 'हा' नवा नियम माहितीये का? जाणून घ्या सविस्तर...
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी जबाबदारी आणि मजबूत सुरक्षा उपाययोजनांची मागणी करत निदर्शने केली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
