प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडले 'त्या' अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे... 6 वर्षांपूर्वीचं हत्या प्रकरण, पण अद्याप सापडलं नाही डोकं!

एका तमिळ अभिनेत्रीच्या शरीराचे काही भाग त्यात सापडले होते, पण तिचं डोकं मात्र अद्याप सापडलेलं नाही. या हत्येमागील भयानक सत्य नेमकं काय? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

पिशवीत सापडले 'त्या' अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे...

पिशवीत सापडले 'त्या' अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे...

मुंबई तक

14 Oct 2025 (अपडेटेड: 14 Oct 2025, 06:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडले 'त्या' अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे...

point

अद्याप डोकं सापडलं नाही!

Crime News: 21 जानेवारी 2019 रोजी चेन्नईच्या पल्लीकरणाई डंप यार्डमध्ये एका व्यक्तीला एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली ज्यातून हाताची बोटे बाहेर आली होती. खरंतर, एका तमिळ अभिनेत्रीच्या शरीराचे काही भाग त्यात सापडले होते, पण तिचं डोकं मात्र अद्याप सापडलेलं नाही. या हत्येमागील भयानक सत्य नेमकं काय? याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

महिलेच्या मृतदेहाचे तुकडे...

डंप यार्ड जवळून एक माणूस जात असताना त्याला अचानक एक विचित्र, जड पॉलिथिन पिशवी दिसली. तो पिशवीजवळ जाताच, त्याला एक मानवी बोट दिसलं आणि ते पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्या माणसाने धीर एकवटून ती पिशवी उघडली. आत त्याला एका महिलेच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव आढळले. त्यानंतर, त्याने तातडीने पोलिसांना फोन केला. पण हा सर्वात मोठा प्रश्न होता की ती महिला कोण होती? कारण मृतदेहाचं डोके किंवा चेहरा नव्हता, फक्त काही शरीराचे अवयव आणि काही दागिने होते.

मृतदेहाच्या उजव्या हातावर दोन टॅटू 

या हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांचं पथक तयार करण्यात आलं. पोलिसांनी अंदाजे 11,700 टन कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून महिलेच्या शरीराचे अवयव शोधले. पण त्या शरीराचं डोकं आणि डावा हात कुठेच सापडला नाही. पोलिसांनी राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांच्या तक्रारी तपासल्या, परंतु याबाबतीत कोणताच पुरावा सापडला नाही. शेवटी, एक आशेचा किरण दिसला. त्या महिलेच्या मृतदेहाच्या उजव्या हातावर दोन टॅटू होते. एक भगवान शंकर आणि पार्वतीचं प्रतीक होतं, तर दुसरा ड्रॅगन. पोलिसांनी त्या स्रोताच्या आधारे तपास सुरू केला.

हे ही वाचा: सुनेच्या खोलीत 5 दिवस लपून राहिला प्रियकर! अचानक सासऱ्यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन् घडलं असं काही की...

टॅटू आणि जन्मखूण पाहून शरीर ओळखलं

त्यावेळी, एका महिलेने तूतीकोरिन पोलीस स्टेशनमध्ये आपली संध्या नावाची मुलगी 20 ते 25 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. खरंतर, तिची मुलगी ही पती आणि दोन मुलांसोबत चेन्नईच्या जाफरखानपेट परिसरात राहत होती. जेव्हा पोलिसांनी संध्याच्या आईला फोन करून शरीराचे अवयव दाखवले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने टॅटू आणि जन्मखूण पाहून शरीर ओळखलं. नंतर, डीएनए चाचणीत तो मृतदेह अभिनेत्री संध्याचा असल्याचं सिद्ध झालं. पोलिसांनी संध्याचा पती बालकृष्णनला अटक केली. सुरुवातीला त्याने असा दावा केला होता की तो 19 जानेवारी रोजी त्याच्या वडिलांच्या घरी गेला होता आणि परतलाच नाही. सखोल चौकशीनंतर, बालकृष्णनने त्या जानेवारी रात्री त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

हे ही वाचा: बांबू उद्योग धोरण जाहीर, मुंबई उच्च न्यायालयात 2228 पदांची निर्मिती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय

संध्याचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा बालकृष्णनला संशय होता. या कारणावरून त्यांच्यात बऱ्याचदा भांडणे व्हायची. त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात बालकृष्णनने संध्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. नंतर त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह पोत्यात भरला आणि त्याचे तुकडे करून ते प्लॅस्टिकच्या भरले. संध्याच्या मृतदेहाचे तुकडे शहरातील विविध भागात फेकून देण्यात आले. 

    follow whatsapp