Crime News : एका महिलेनं आपल्याच दोन जुळ्या मुलांची हत्या केली आणि नंतर एका इमारतीवरून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना मंगळवारी हैदराबाद येथील पद्मनगर कॉलनीतील फेज 1 मध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव साई लक्ष्मी असे आहे. तर दोन हत्या केलेल्या अपत्यांचीही नावे समोर आली आहेत. एकाचं नाव चेतन कार्तिकेय आणि दुसरे अपत्य मुलीचं नाव लस्यता वल्ली असे होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : परभणी हादरलं! विवाहित महिलेच्या प्रेमात वेडा झाला तरुण, लग्न करण्याचा धरला हट्ट, कुटुंबियांनी विरोध केल्यानं थेट रेल्वेखाली...
नेमकं प्रकरण काय?
महिलेनं पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या दोन जुळ्या मुलांना उशीने गळा दाबत त्यांची हत्या केली. नंतर महिलेनं इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. स्थानिकांना तिचा मृतदेह हा रस्त्यावर आढळला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलीस प्रशासनाला दिली होती.
पीडित महिला ही मंगळवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास साई लक्ष्मीने आपला नवरा अनिल कुमार नोकरीवर असताना आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली आणि इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं. त्याचक्षणी घटनास्थळी अनेकांनी धाव घेत महिलेच्या मृतदेहाजवळ गेले. त्यानंतर काही जण घरात गेले असता, दोन्ही मुलं मृतावस्थेत दिसून आली होती.
हे ही वाचा : खोक्या भोसलेच्या कुटुंबानंतर आणखी एका महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, बीडमध्ये नेमकं चाललं काय?
आत्महत्येमागेचं कारण समोर
दरम्यान, महिलेनं केलेल्या आत्महत्येचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला दिसून येत आहे. साई लक्ष्मीच्या आत्महत्येमागेचं कारण आता समोर आलं आहे. घरगुती कलहामुळे निर्माण झालेल्या नैराश्यामुळे पीडितेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलाला बोलता येत नसल्याने तिचा पती नेहमी पीडितेला टोमणे द्यायचा, याच त्रासातून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
