Crime News: उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक महिला पाच वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, आता तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला 35 लाख रुपये भरपाई मिळणार असल्याने ती पुन्हा तिच्या सासरी आली. त्यानंतर, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
पाच वर्षांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेली
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण हे रक्सा पोलीस स्टेशन परिसरातील डगरवाह गावातील आहे. पंधरा वर्षांपूर्वी येथे राहणाऱ्या ज्वाला प्रसाद अहिरवार नावाच्या शेतकऱ्याचं रेखा नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं असून रेखा पाच वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती.
संपत्तीमधील हिस्सा मागण्याचा दावा
रिपोर्ट्सनुसार, संबंधित महिला प्रियकरासोबत पळून गेल्याच्या पाच वर्षांनंतर महिलेच्या पतीचं दुर्दैवी निधन झालं. पतीच्या निधनानंतर, त्याच्या संपत्तीवर निवासी विकास योजनेअंतर्गत मोठी भरपाई मिळणार असल्याचं महिलेला समजलं. त्यानंतर, ती तिच्या प्रियकराला सोडून पुन्हा पतीच्या घरी आली आणि संपत्तीमधील तिचा हिस्सा मागण्याचा दावा करू लागली.
हे ही वाचा: चार मुलं झाली, आर्थिक समस्यांनी हैराण, आईने दोन दिवसांच्या बाळाला 50 हजाराला... संतापजनक प्रकार
याबाबत मृत तरुणाच्या भावाने सांगितलं की, वहिनी तिच्या पतीसह दोन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, आता पतीचा मृत्यू आणि त्याची मोठी भरपाई मिळणार असल्याची माहिती तिला मिळाली आणि त्यातील तिचा हिस्सा मागण्यासाठी ती पाच वर्षांनंतर घरी परत आली. पुन्हा सासरी आल्यानंतर, तिने घरातील इतर लोकांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. मुलांना सुद्धा याचा खूप त्रास झाला.
केवळ पैशांसाठी पुन्हा घरी आली
महिलेच्या मुलांनी सुद्धा याबद्दल बोलताना सांगितलं की त्यांची आई त्यांना सतत मारत असते आणि त्यांना जेवण सुद्धा देत नाही. तसेच, ती मुलं अगदी लहान असताना त्यांना सोडून त्यांची आई प्रियकरासोबत पळून गेली. वडिलांच्या निधनानंतर, आई केवळ पैशांसाठी पुन्हा घरी आली. पतीच्या संपत्तीवर 30 ते 35 लाखांची भरपाई मिळणार असल्याने महिला परत सासरी आल्याचं मुलांच्या काकीने सांगितलं.
हे ही वाचा: विरार: प्रियकराने अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं... वडिलांना मारहाण! नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
पीडित मुलांनी सुद्धा त्यांच्या आईविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना सांगितलं की, आईचा वडिलांच्या संपत्तीवर डोळा आहे आणि तो हिस्सा विकणार असल्याची ती सतत धमकी देत आहे. अशातच, महिलेविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मुलांनी मागणी केली आहे. सध्या, पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास केला जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
