48 वर्षांपासून फरार आरोपी अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात! आरोपीचा गुन्हा समजला तर हादरूनच जाल...

मुंबईतील कुलाबा पोलिसांनी 48 वर्षांपासून फरार असलेल्या एका 77 वर्षांच्या आरोपी वृद्धाला अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे.

48 वर्षांपासून फरार आरोपी अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

48 वर्षांपासून फरार आरोपी अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई तक

• 08:33 AM • 16 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

48 वर्षांपासून फरार आरोपी अखेर मुंबई पोलिसांच्या ताब्यात!

point

1977 प्रकरणातील आरोपीचा 'असा' घेतला शोध

Mumbai Crime: मुंबईतील कुलाबा पोलिसांनी 48 वर्षांपासून फरार असलेल्या एका 77 वर्षांच्या आरोपी वृद्धाला अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे. हा आरोपी 1977 च्या प्रकरणाशी संबंधित असून त्याचं नाव चंद्रशेखर मधुकर कालेकर असल्याची माहिती आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी न्यायालयाने संबंधित व्यक्तीला फरार गुन्हेगार घोषित केलं होतं.

हे वाचलं का?

प्रेयसीवर घेतला संशय अन्...

1977 मध्ये, आरोपी लालबाग येथील हाजी कासम चाळीत राहत होता. तसेच, तो वरळीमधील एका खाजगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. तो बऱ्याचदा आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत पार्टी करायचा. अशाच एका पार्टीत त्याची एका महिलेशी ओळख झाली आणि हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र, कालांतराने कालेकरला ती महिला दुसऱ्या एका पुरुषासोबत बोलत असल्याचा कालेकरला संशय आला. याच संशयामुळे आरोपीच्या मनात तिच्या प्रेयसीबद्दल रागाची भावना निर्माण झाली आणि संतापलेल्या प्रियकराने महिलेवर धारदार शस्त्राने हात, पोट आणि पाठीवर गंभीर वार केले. यामधून महिला कशीबशी वाचली परंतु, ती गंभीररित्या जखमी झाली. 

हे ही वाचा: सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेचे कॉलेज प्रशासनावर आरोप! घटनेनंतर 'स्टाफने अंघोळ आणि कपडे बदलण्याचा सल्ला...'

पोलिसांना पुरावे मिळण्यात अडचणी

त्यावेळी, आरोपी कालेकरला अटक करुन त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. मात्र, 15 दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला आणि त्यानंतर, तो न्यायालयात कधीच हजर राहिला नाही. पुढील बरीच वर्षे त्याचं नाव बदलून तो मुंबई ते बदलापुर पर्यंत आपलं वेगवेगळं ठिकाण बदलत राहिला. यामुळे, पोलिसांना पुरावे मिळण्यात अडचणी उद्भवू लागल्या.

हे ही वाचा: चार मुलं झाली, आर्थिक समस्यांनी हैराण, आईने दोन दिवसांच्या बाळाला 50 हजाराला... संतापजनक प्रकार

'असा' घेतला आरोपीचा शोध...

जवळपास 48 वर्षांनंतर, डीसीपी प्रवीण मुंढे आणि एसीपी शशी किरण काशीद यांच्या देखरेखीखाली कुलाबा पोलिसांकडून हा खटला पुन्हा उघडण्यात आला. पोलीस पथकाने सर्व मतदार याद्या आणि आरटीओ रेकॉर्ड तपासले. आरटीओच्या आकडेवारीवरून कालेकरचा ड्रायव्हिंग लायसन्स 2023 मध्ये रिन्यू करण्यात आलं होतं आणि त्यात त्याचा सध्याचा फोटो होता. पोलिसांनी तो फोटो माजी सहकाऱ्यांना दाखवला आणि याच आधारे, आरोपीची ओळख पटवण्यात आली. मोबाईलच्या IMEI नंबरच्या मदतीने लोकेशन ट्रेस करण्यात आलं आणि पोलिस पथकाकडून आरोपीला रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील करंजणी गावातून अटक केली.

    follow whatsapp