“माहेरहून स्कॉर्पिओ आण नाहीतर...” हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण, वकीलाच्या बायकोचा 'त्या' अवस्थेत आढळला मृतदेह!

हुंड्यासाठी सतत छळ आणि पतीकडून मारहाण करण्यात आल्यामुळे महिलेने फाशी घेत स्वत:चं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे.

हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण..

हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण...

मुंबई तक

• 12:15 PM • 02 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

“माहेरहून स्कॉर्पिओ आण नाहीतर...”

point

विवाहित महिलेचा सतत छळ अन् पतीकडून मारहाण

point

वकीलाच्या बायकोचा त्या अवस्थेत आढळला मृतदेह!

Crime News: उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या दीपांशी नावाच्या महिलेचं 2 मार्च 2024 रोजी पेशाने वकील असलेल्या विशाल नावाच्या तरुणासोबत लग्न झालं. विशालचे वडील राजेंद्र हे बिजनौरमध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. दोघांचंही लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलं आणि कुटुंबियांनी अगदी आनंदात त्यांच्या मुलीची पाठवणी केली. त्यांना वाटलं की कुटुंब चांगलं असल्यामुळे त्यांची मुलगी तिथे नेहमीच आनंदी राहील. लग्नाच्या वेळी, वधूच्या बाजूने हुंडा म्हणून एक कार, सोने आणि चांदी आणि इतर बऱ्याच महागड्या वस्तू देखील दिल्या. पण दीपांशीच्या कुटुंबियांनी ज्याची अपेक्षा केली होती त्याच्या उलटच घडलं. लग्नाच्या झाल्यापासूनच दीपांशीचा छळ केला जायचा.

हे वाचलं का?

परंतु, 30 नोव्हेंबर रोजी दीपांशीसोबत जे काही घडलं ते तिच्या संपूर्ण कुटुंबियांना हादरवून टाकणारं होतं. रात्री 11 वाजता दीपांशीच्या कुटुंबियांना तिच्या सासऱ्यांचा फोन आला. ते म्हणाले, "तुमची मुलगी वारली आहे. लवकर इकडे या." तिचे कुटुंब येईपर्यंत सर्व सासरचे लोक अचानक गायब झाले होते आणि त्यांच्या मुलीचा घरातच मृतदेह पडला होता.

दीपांशीसोबत काय घडलं

24 वर्षीय दीपांशी ही रामपूर मनिहारन पोलिस स्टेशन हद्दीतील जानखेडा गावाची रहिवासी होती. दीपांशीच्या कुटुंबाने आता तिच्या सासरच्या लोकांवर बरेच खळबळजनक आरोप केले आहेत. मृत महिलेच्या वडिलांनी सांगितलेल्या धक्कादायक गोष्टींनी पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

सासरच्यांना स्कॉर्पिओ हवी होती... 

दीपांशीचा मृतदेह तिच्या खोलीत फासावर लटकलेला आढळला होता. कुटुंबियांचा असा दावा आहे की दीपांशीने घटनेच्या दिवशी त्यांना तिचे सासरचे लोक तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचं फोन करून सांगितलं होतं आणि त्याच रात्री त्यांना त्यांची मुलगी मृतावस्थेत. मृताच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांच्या मुलीला लग्ना झाल्यापासूनच हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. तिच्या सासरच्यांना हुंडा म्हणून स्कॉर्पिओ हवी होती. जर ती गाडी त्यांना मिळाली नाही तर त्यांनी तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी सुद्धा दिली होती. 

हे ही वाचा: Nagar Parishad Voting LIVE: नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात, 'या' जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी किती?

हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण  

पीडितेच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा जावई विशाल तो त्यांच्यासाठी राक्षस ठरला. दारू प्यायल्यानंतर विशाल पत्नीला खूप मारहाण करायचा आणि तो सतत तिला म्हणायचा की स्कॉर्पिओ आण नाहीतर तुला मारून टाकेन. पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितलं की, या प्रकरणाबाबत बऱ्याचदा दोन्ही पक्षात सविस्तर बोलणं आणि समजावून देखील सांगण्यात आलं. पण तरीही पीडितेला सासरी छळ सहन करावा लागला. 

हे ही वाचा: दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध! प्रेमसंबंधात आड येणाऱ्या पतीचा काढला काटा, प्रियकरासोबत मिळून आखला प्लॅन अन्...

पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी टीमला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. आता, पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp