अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करायची धमकी, नराधमाने अनेकदा केला लैंगिक अत्याचार

Maharashtra Crime : एका तरुणाने निष्पाप मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास निर्माण केला. त्यानंतर तिची इच्छा नसताना तिचं लैंगिक शोषण केलं आहे. तो नराधम इथवर न थांबता त्याने पीडितीचे फोटो सर्वत्र शेअर केले.

maharashtra crime

maharashtra crime

मुंबई तक

17 Jul 2025 (अपडेटेड: 17 Jul 2025, 02:07 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फलटण तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

point

मुलीचे अश्लील व्हिडिओ केले शेअर

Maharashtra Crime : राज्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने निष्पाप मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास निर्माण केला. त्यानंतर तिची इच्छा नसताना तिचं लैंगिक शोषण केलं आहे. तो नराधम इथवर न थांबता त्याने पीडितीचे फोटो सर्वत्र शेअर केले. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली आहे. पीडितेचं लैंगिक शोषण करून बदनामी करणाऱ्या तरुणाचे नाव करण प्रमोद (वय 21) असे आहे. याला पोलिसांनी वाठार येथे अटक केली आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : अंगारक योगामुळे 'या' राशीतील लोकांचं होणार मोठं नुकसान, कारणं आलं समोर, तुमची रास आहे का पाहा?

नेमकं प्रकरण काय होतं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील एका तरुणीवर कावडेवाडी येथे राहणाऱ्या करण आगमने मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर तरुणीवर तर कधी दुसऱ्याच्या घरी नेलं आणि लैंगिक अत्याचार केले. तो नराधम इथवर न थांबता त्याने पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. 

मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत संशयित आरोपीने स्वत:च्या घरात जबरदस्तीने पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला. 

हेही वाचा : Mumbai Tak Baithak 2025: 'त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..' CM फडणवीसांची माघार नाहीच.. ठणकावून सांगितलं!, ठाकरे बंधूंना थेट आव्हान?

असा लागला प्रकरणाचा छडा

या प्रकरणात पीडितेनं वाठार पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेनं तक्रारीत नमूद केलं की, सोमवारी (ता.14 ) रोजी रात्रीच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या आईला शिवीगाळ केली होती. तो इथवरच न थांबता पीडित मुलीचे नग्न फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आणि संबंधित अश्लील फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. दरम्यान, वाठार पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या करण आगामच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित संवेदनशील घटनेचा तपास कोरेगाव पोलीस करत असल्याची माहिती समोर आली.

    follow whatsapp