Wife Killed Husband Crime News : छत्तीसगढच्या बलरामपूरमध्ये 29 जुलै रोजी एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पहिल्या पत्नीच्या घरीच मृतदेह सापडल्याने अनेकांना हादराच बसला आहे. मृत व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. आता पोलिसांनी हे प्रकरणाचा तपास लावला आहे. पहिल्या पत्नीनेच हत्येचा कट रचून पतीला मारलं आणि नंतर हे अपघाताने घडल्याचं पोलिसांना सांगितलं. मनोज गुप्ता 40 असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी याप्रकरणाबाबत म्हटलंय की, कौटुंबिक वादविवादामुळे पहिल्या पत्नीने तिच्या पतीचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्याला वीजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पतीचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात पुढील कारवाई सुरु आहे. मागील काही वर्षांपासून कुटुंबात वादविवाद होत होते. पतीने दुसरं लग्न केलं होतं. यामुळे घरात वादविवाद होत होते. मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे टेन्शन आलं आणि तिने पतीची हत्या केली.
हे ही वाचा >> आधी पतीचा मृत्यू अन् नंतर कमी वय असलेल्या तरुणासोबत फरार... दोन मुलांच्या आईने 'असं' का केलं?
अर्धनग्न अवस्थेत सापडला त्या व्यक्तीचा मृतदेह
पोलिसांना पहिल्या पत्नीच्या घरात मनोज गुप्ताचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. त्याचे हात पाय बांधलेले होते आणि शरीरावर अनेक ठिकाणी जळलेले निशाण होते. वीजेच्या ताराही शरीराजवळ पडलेल्या होत्या. मृताची पत्नी दरवाजा उघडल्यानंतर बेशुद्ध झाली. दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी पतीला मृत घोषित केलं.
दुसऱ्या पत्नीने व्यक्त केला संशय
चांदनीने पहिली पत्नी पार्वतीवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृताने काही वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं आणि तिला एक मुलगाही आहे. तेव्हापासून दोघींमध्ये वाद सुरु होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांचं म्हणणं आहे की, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि तपासानंतरच हत्येमागचं कारण स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पार्वती गुप्ताला अटक केली.
हे ही वाचा >> नराधम पतीने प्रेग्नंट पत्नीच्या पोटावर लाथ मारली..पत्नीने आईला WhatsApp वर मेसेज केला अन् नंतर घडलं भयंकर!
ADVERTISEMENT
