'तो बलात्कार करत होता, त्याचा मित्र पाहत होता, मैत्रिणीची वहिनी मात्र...', मुलीने सांगितली हादरवून टाकणारी कहाणी

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 07:26 PM)

Minor Girl Rape Case : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात भयानक घटना घडलीय. येथील एका अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Bihar Minor Girl Rape Case

Bihar Minor Girl Rape Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नराधमाने शौचाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

point

पीडित मुलीला बेशुद्ध केलं आणि...

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Minor Girl Rape Case : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात भयानक घटना घडलीय. येथील एका अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रोहित नावाच्या तरुणानं या मुलीवर बलात्कार केला आणि त्याचा मित्रा राजेश हे निर्दयी कृत्य पाहत होता. औराई पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात 20 जूनला ही घटना घडली. शौचाला बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधम तरुणाने बलात्कार केला.

हे वाचलं का?

पीडित मुलगी बेशुद्ध झाली अन् आरोपींनी पळ काढला...

याप्रकरणी 27 जूनला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. रोहित कुमार आणि राजेश कुमार अशी आरोपींची नावं आहेत. रिपोर्टनुसार, 20 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पीडित मुलगी एका महिलेसोबत शौचाला गेली होती. याचदरम्यान तिच्यावर अत्याचार केला. तेव्हा तिच्यासोबत असलेली महिला तिथून पळून गेली. दरम्यान, पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, आरोपी रोहितने तिला पकडून शेतात नेलं आणि तिच्यासोबत अत्याचार केला.

हे ही वाचा >> वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटलं, चिमुकलीवर बाजूला नेत अत्याचार, दौंडमध्ये संताप

राजेथ तिथेच उभा राहून बलात्काराची घटना पाहत होता. त्यानंतर दोघांनीही बेशुद्ध अवस्थेत मला तिथेच सोडलं आणि ते पळून गेले. पीडित मुलगी घरी पोहोचल्यावर तिने या घटनेबाबत कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी डॉक्टरला बोलवून तिच्यावर उपचार सुरु केले. पोलीस अधिकारी राजा सिंह यांनी म्हटलंय की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी कसून तपास सुरु आहे.

त्या रुग्णालयातही घडला होती संतापजनक घटना

दिल्लीतील जग प्रवेश चंद्र रुग्णालयात 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. नराधमांनी तरुणीवर बलात्कार केल्याने तिला आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच असताना ती शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडली होती. तेव्हा एका अन्य रुग्णाने तिला ओपीडी विभागात नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या घटनेमुळं दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा >> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?