Crime News: बिहारमधील पाटणा येथून एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित प्रेयसीने तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली असल्याची सांगितलं जात आहे. आरोपी महिलेने तिच्या प्रियकराचं डोकं खलबत्त्याच्या दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची माहिती आहे. नंतर, आरोपी प्रेयसीने स्वतः पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रेयसी तिच्या प्रियकराच्या मृतदेहाजवळ बसली होती. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपी प्रेयसीला अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
विवाहित महिलेचे तरुणासोबत प्रेमसंबंध...
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (26 सप्टेंबर) रात्री उशीरा कंकरबाग पोलीस स्टेशन परिसरातील चिरैयाटांड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. गौरीचक येथील रहिवासी पूजा कुमारी हिचे मोकामा येथील रहिवासी मुरारी कुमार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. पूजा कुमारी टीपीएस कॉलेजजवळील परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होती.
पूजा गेल्या पाच वर्षांपासून मुरारीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मुरारी जवळपास चार वर्षांपासून त्यांच्या लग्नाबद्दल बोलत होता, पण त्याने त्याचं वचन पाळलं नसल्याचं पूजाने सांगितलं. मुरारी हा बेंगळुरूमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो काही दिवसांपूर्वीच पाटणा येथे परत आला आणि पूजासोबत भाड्याच्या घरात राहत होता.
हे ही वाचा: पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
लग्नावरून मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात...
लग्नावरून दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. दोघांचा वाद इतका टोकाला पोहोचला की पूजाने रागाच्या भरात मुरारी झोपेत असताना त्याच्या डोक्यात खलबत्त्याच्या दगडाने वार केले. त्यानंतर तिने त्याच्यावर कळशीने हल्ला केला. हत्येच्या वेळी, घरातील भिंत आणि पलंग रक्ताने माखले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पूजा आधीच विवाहित असून ती तिची मुलगी आणि भाची यांसोबतच तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. घटनेच्या वेळी आरोपी महिलेची मुलगी आणि भाची शेजारच्या खोलीत झोपल्या होत्या. याव्यतिरिक्त, पूजाला तिच्या प्रियकराची जमीन आणि पैसे हडप करायचे होते, असा मुरारीच्या भावाने दावा केला. मुरारीने त्याच्या बहिणीकडून एक लाख रुपये उधार घेतले होते आणि तो जमीन खरेदी करण्याच्या प्रयत्नात होता. पूजाला त्या जमिनीची रजिस्ट्री तिच्या नावावर हवी होती, पण मुरारीने यासाठी नकार दिला.
हे ही वाचा: “इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीचा हट्ट अन् पत्नीने दिला नकार! नंतर घडलं असं काही की...
संबंधित घटनेची माहिती मिळताच कंकडबाग पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमनेही प्रकरणाचा तपास केला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. पोलिसांकडून प्रेयसीला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
