पुणे: सहकारी तरुणीला प्रपोज केलं, पण नकार मिळताच प्रचंड संतापला! रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...
पुण्यात ‘एआय’च्या मदतीने एका तरुणीचे अश्लील फोटो बनवून तिला ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सहकारी तरुणीला प्रपोज केल्यानंतर नकार मिळाला...

रागाच्या भरात फेक आयडी, अश्लील फोटोज अन्...

पुण्यातील तरुणीसोबत काय घडलं?
Pune Crime: पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘एआय’च्या मदतीने एका तरुणीचे अश्लील फोटो बनवून तिला ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणीच्या ऑफिसमधील एका सहकारी तरुणाने तिच्यासोबत हे घाणेरडं कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, पीडितेची सहानुभूती मिळवण्यासाठी आरोपी तरुणाने तिला मदत करत असल्याचा खोटा बनाव रचल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी तरुणाला अटक केल्याची माहिती आहे.
सहकारी तरुणीला केलं प्रपोज
या प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव सुदर्शन सुनील जाधव (25) असं असून तो चाकण येथे राहून एका खाजगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ऑफिसमध्ये एका सहकारी तरुणीवर त्याचं प्रेम जडलं आणि त्याने तिला थेट प्रपोज केलं. मात्र, संबंधित तरुणीच्या आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेमाच्या भावना नसल्यामुळे त्याने आरोपी तरुणाच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपी प्रचंड संतापला आणि त्याने तरुणीच्या विरोधात एक कट रचला. रागाच्या भरात आरोपीने पीडितेचे लपुनछपून फोटो काढले आणि एआयच्या साहाय्याने ते फोटो अश्लील पद्धतीचे बनवले. दरम्यान, आरोपीने सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून त्यावरून पीडितेला अश्लील मॅसेजेस पाठवले.
हे ही वाचा: “इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीचा हट्ट अन् पत्नीने दिला नकार! नंतर घडलं असं काही की...
फेक आयडी बनवून त्यावर अश्लील फोटो पाठवले अन्...
फेक आयडीवरून आरोपी तरुणाने पीडितेला तिचे अश्लील फोटो पाठवले आणि ते फोटोज व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे तरुणी अतिशय घाबरली आणि याबाबत तिने आपल्या सहकारी मित्राला सांगण्याचं ठरवलं. अत्यंत विश्वासाने तिने आरोपी तरुणाला तिला इंस्टाग्रामवर आलेल्या धमकीबद्दल सांगितलं. मात्र, आरोपी तरुणाने एवढ्यावरच न थांबता पीडितेची सहानुभूती मिळवण्यासाठी तिला मदत करण्याचं नाटक केलं. सुदर्शन हा पीडित तरुणीला घेऊन चिखली पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि याविरोधात तक्रार करण्यासाठी त्याने पीडितेची मदत केली. या प्रकरणाबाबत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सुद्धा घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली. सायबर पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्या आणि मोबाइल कंपन्यांकडे पत्रव्यवहार करून संबंधित मोबाइल नंबरधारकाची ओळख पटवली.
हे ही वाचा: डोंबिवली हादरली! 47 वर्षीय मुख्याध्यापकाचं पहिलीत शिकणाऱ्या मुलीसोबत संतापजनक कृत्य
पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध...
त्यानंतर पोलिसांनी संशयित मोबाइल नंबरधारकाची चौकशी केली. त्यावेळी, त्या तरुणाने आपला मोबाईल मागील काही दिवसांपूर्वी हरवला असून त्याबाबत पोलिसांत तक्रार केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट वापरलेल्या डिव्हाइसचा ‘आयपी ॲड्रेस’ काढून नवीन मोबाइल नंबर मिळवला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांना आरोपी सुदर्शनची माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी सुदर्शनला अटक केली आणि चौकशीदरम्यान, आरोपी तरुणाने त्याचा गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं जात आहे.