डोंबिवली हादरली! 47 वर्षीय मुख्याध्यापकाचं पहिलीत शिकणाऱ्या मुलीसोबत संतापजनक कृत्य
Dombivli Crime : डोंबिवलीच्या ग्रामीण भागातून संतापजनक घटना समोर आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डोंबिवलीतून संतापजनक घटना समोर आलीये.

मुख्याध्यापकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना
Dombivli Crime : डोंबिवलीच्या ग्रामीण भागातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या 7 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय. डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील निळजे गावात एका शाळेत ही संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी वासनांध मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. महेंद्र खैरनार असं पोलिसांनी अटक केलेल्या नराधम मुख्याध्यापकाचं नाव आहे.
हेही वाचा : “इंस्टाग्रामवर रील्स बनवून पैसे कमव नाहीतर...” पतीचा हट्ट अन् पत्नीने दिला नकार! नंतर घडलं असं काही की...
47 वर्षीय मुख्याध्यापकाकडून पहिलीतील मुलीवर लैंगिक अत्याचार
अधिकची माहिती अशी की, डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील निळजे गावातील एका शाळेत मुख्याध्यापकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. निळजे गावातील एका शाळेत एका 47 वर्षीय मुख्याध्यापिकेने सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जातोय.
हेही वाचा : Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!