Crime News: बऱ्याचदा आपल्या मनातील गोष्टी शेअर करण्यासाठी लोक इतर व्यक्तींचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याच बाबतीत लोक अनेकदा चुकींच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि यामुळे होत्याचं नव्हतं होऊन बसतं. उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत सुद्धा अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित महिलेचा पती तिला सतत मारहाण करत असल्यामुळे ती तिच्या पतीला वैतागली होती. त्यानंतर, तिने इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत मैत्री केली.
ADVERTISEMENT
ती महिला सतत तिच्या मित्राला पतीकडून होणाऱ्या जाचाबद्दल सांगायची. कालांतराने दोघांमधील बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यातील जवळीक सुद्धा वाढत गेली. आता तो तरुण दररोज महिलेला व्हिडीओ कॉल करायचा. महिलेचा पती झोपल्यानंतर, तो त्याच्या मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करायचा. दरम्यान, त्या तरुणाने महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवून घेतले. आपल्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेचा त्या तरुणाने पूर्ण फायदा उचलला.
हे ही वाचा: लग्नानंतर पतीमुळे हनीमून साजरा झालाच नाही! बायको म्हणाली, "तू तर नपुंसक..." नंतर, केली 'ती' मागणी अन्...
इंस्टाग्रामवर मैत्री आणि व्हिडीओ कॉलवर बोलणं
संबंधित प्रकरण पीजीआय पोलीस स्टेशन परिसरातील असल्याची माहिती आहे. येथे एका विवाहित महिलेने पोलिसात त्या तरुणाविरुद्ध तक्रार करत FIR दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, माझा पती मला नेहमी मारहाण करायचा. त्याच्या याच वागण्याला कंटाळून मी इंस्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री केली. त्याला मी माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर केल्या. त्यावेळी, त्याने माझा फोन नंबर सुद्धा मागितला आणि मी काहीच विचार न करता त्याला माझा फोन नंबर दिला. तो दररोज मला फोन करायचा आणि व्हिडीओ कॉलवर बोलण्याचा हट्ट करायचा.
हे ही वाचा: मंत्रालयात नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपये उकळले, शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
50 हजार दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल...
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती झोपल्यानंतर आरोपी तरुणाशी ती व्हिडीओ कॉलवर बोलायची. तसेच, आरोपीने पीडितेला लग्न करण्याचं आश्वासन सुद्धा दिल्याचं तिने सांगितलं. महिला तरुणाच्या बोलण्यात आली. दरम्यान, आरोपी तरुणाने तिचे अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवले. काही काळानंतर, त्याने पीडितेला तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याने महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा त्याने महिलेला दिली. पण, पीडितेने आरोपीची ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला असता त्याने कसलाच विचार न करता तो व्हिडीओ व्हायरल केला. पीडितेने यासंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून तिने न्यायाची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
