मंत्रालयात नोकरीचे अमिष दाखवून लाखो रुपये उकळले, शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
Palghar Crime : मंत्रालयात नोकरी लावून देतो असं सांत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवून शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने लाखो रुपये उकळले

शिंदे गटाच्या पालघरमधील जिल्हा प्रमुखाकडून नोकरीचं अमिष दाखवून फसवणूक
Palghar Crime : मंत्रालयात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख सौरभ आप्पा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिंदे गटाच्या पालघर जिल्ह्याच्या प्रमुखाने ही फसवणूक केलीये. सौरभ आप्पा असं फसवणूक करणाऱ्या जिल्हाप्रमुखाचं नाव आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या विक्रांत ठाकरेच्या बहिणीने याबाबत फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांची चिंताच मिटली! भारत सरकारच्या कंपनीत मिळवा नोकरी, कधीपर्यंत कराल अर्ज?
अधिकची माहिती अशी की, मंत्रालयात क्लार्कची नोकरी अमिष दाखवून दोन लाख वीस हजार रुपये उकळल्याचा आरोप शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखावर करण्यात आलाय. या फसवणुकीला बळी पडलेला तरुण विक्रांत केशव ठाकरे याचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे.विक्रांतची बहीण मयुरी लाटे हिने या प्रकरणीव सौरभ आप्पाविरोधात फिर्याद दाखल केली. त्यावरून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 316(2) आणि 318(4) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीने आरोपी सौरभ आप्पा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव "काळे" यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉटही पोलिसांना पुराव्यासरशी दिले आहेत.सौरभ आप्पाने आतापर्यंत 50 पेक्षा अधिक तरुणांना नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आलाय. पालघर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, याबाबतची माहिती पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे.