लग्नानंतर पतीमुळे हनीमून साजरा झालाच नाही! बायको म्हणाली, "तू तर नपुंसक..." नंतर, केली 'ती' मागणी अन्...
आपला पती शारीरिक संबंध बनवू शकत नसल्याने एका महिलेने पतीवर गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, महिलेने तिच्या पतीकडून 2 कोटी रुपयांची मागणी केली. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नानंतर पतीमुळे हनीमून साजरा झालाच नाही!

पतीला नपुंसक म्हणत केली 'ती' मागणी अन्...
Crime News: कर्नाटकातील बंगळुरू येथून एका विचित्र कौटुंबिक वादातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. आपला पती शारीरिक संबंध बनवू शकत नसल्याने एका महिलेने पतीवर गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. इतकेच नव्हे तर, महिलेने तिच्या पतीकडून 2 कोटी रुपयांची मागणी केली. नेमकं काय घडलं?
संबंधित प्रकरण बंगळुरूमधील गोविंदराज नगर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. येथे राहणाऱ्या प्रवीण के. एम नावाच्या तरुणाचं 5 मे 2025 रोजी चंदना नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर, बंगळुरूच्या सप्तगिरी पॅलेसमध्ये मोठं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. या समारंभाचा संपूर्ण खर्च प्रवीणच्या कुटुंबियांनी केला होता. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर, चंदना गृहप्रवेश करण्यासाठी बंगळुरू येथे आली आणि तिथे जवळपास सात दिवस राहिली.
शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकले नाहीत...
16 मे रोजी प्रवीणच्या मावशीच्या घरी दोघांचा हनीमून साजरा करण्याचं निश्चित झालं. मात्र, काही कारणास्तव दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकले नाहीत. याच गोष्टीवरून चंदना संतापली आणि तिने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ती सतत तिच्या नवऱ्याला टोमणे मारायची, शिवीगाळ करायची, इतकेच नव्हे तर आपल्या पतीला नपुंसक म्हणून ती सतत अपमानित करायची.
19 मे रोजी चंदना प्रवीणला आपल्या काकाच्या घरी घेऊन गेली आणि सगळी बाब सांगितली. त्यानंतर, 21 मे रोजी चंदनाचे नातेवाईक आणि कुटुंबीय प्रवीणच्या घरी पोहोचले आणि तिथे मोठा गोंधळ सुरू झाला.